ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन युवक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two youths killed on spot in collision with traveller accident amravati

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन युवक ठार

नांदगाव पेठ : वरुड कडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक घटनास्थळीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान चीचखेड फाट्यावर घडली.माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले दोन्ही युवकांची ओळख अद्याप पटलेली नसून ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ट्रॅव्हल्स क्र.एम.पी.३०,पी.२९५ भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जात असतांना दोन युवक नवीन हिरो स्प्लेन्डर ने माहुली जहागीर कडे येत असतांना चीचखेड फाट्यानजीक ट्रॅव्हल्स ने दुचाकीला जबर धडक दिली यामध्ये दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. नागरिकांनी माहुली जहागीर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली.पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरुळकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. ट्रॅव्हल्स च्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास माहुली जहागीर पोलीस करीत आहेत.