esakal | सुरजागड प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका काय? उदय सामंतांनी दिले उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

सुरजागड प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका काय? उदय सामंतांनी दिले उत्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पासंदर्भात (surjagad project gadchiroli) शिवसेनेची अधिकृत भूमिका ठरायची आहे. पक्षाचे गडचिरोलीतील पदाधिकारी व शिवसैनिकांसोबत सुरजागड पहाडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करू, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ( MinisterUday samant) यांनी सोमवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत दिली. (uday samant statement on surjagad project in gadchiroli)

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

गडचिरोली जिल्ह्यात लॉयड मेटल्सची लीज असलेल्या सुरजागड पहाडावर त्रिवेणी अर्थमुव्हर्स ही कंपनी काम करत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकल्पाच्या विरोधात ठाम भूमिका मांडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रकल्पाला समर्थन दिले होते. यावरून महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांची भूमिका स्पष्ट झाली. मात्र, तिसऱ्या घटक पक्षाची, शिवसेनेची नेमकी भूमिका स्प्ट झाली नव्हती.

यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत म्हणाले की, सुरजागड पहाड परिसरात जाऊन परिस्थितीचा अनुभव घेऊ व मग पक्षातील वरिष्ठांना त्याबाबतची माहिती देऊन त्यानंतर अधिकृत भूमिका कळवू.

गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजचा प्रश्न सुटला असून त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठाच्या जागेचीही समस्या मिटली असून १५० एकर जागा लवकरच ताब्यात येणार आहे. शिवाय चंद्रपूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चार एकर जागा देण्याचा निर्णयही तत्वत: आज घेतला आहे. विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा तिढा लवकरच सुटेल. या विद्यापीठाअंतर्गत गडचिरोली येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करता आल्यास आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, शिवसेना जिल्हा प्रमुख सुल्वावार आदींची उपस्थिती होती.

...तर आठ दिवसांत निवडले असते कुलगुरू -

मागील नऊ महिन्यांपासून गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रश्न खितपत पडला आहे. विद्यापीठ कुलगुरू निवड आमच्या अखत्यारित येत नाही. ते अधिकार राज्यपालांना आहेत. राज्यपालांनी मला हे अधिकार दिले असते, तर आठ दिवसांत या विद्यापीठासाठी कुलगुरूंची निवड केली असती, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले.

loading image
go to top