शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी : उध्दव ठाकरे

मनाेज भिवगडे
सोमवार, 15 मे 2017

आघाडी सरकारच्या काळात शिवसेना शेतकरी कर्जमुक्तीसाठी आक्रमक झाली हाेती. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच शिवसेनेेने संपर्क अभियान सुरु केले आहे.

अकाेला - राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून त्याला आधार देण्याची गरज आहे. यासाठी कर्जमाफी नव्हे कर्जमुक्तीची गरज असल्याचे मत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तत्पूर्वी त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या व्यथा जाणून घेतल्या. 

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाअंतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साेमवारी अकोल्यात आले हाेते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना गंभीर असल्याचे सांगून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही याचा खुलासा केला.

आघाडी सरकारच्या काळात शिवसेना शेतकरी कर्जमुक्तीसाठी आक्रमक झाली हाेती. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच शिवसेनेेने संपर्क अभियान सुरु केले आहे. त्यासाठी गरज पडल्यास जनआंदाेलन सुध्दा सरकारविराेधात उभारण्याची तयारी आहे. आगामी काळात पक्ष संघटनासाठी सुध्दा प्रयत्न केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून १९ मे राेजी नाशिकमध्ये राज्यव्यापी मेळावा आयाेजित केला आहे. सरकार व्यवस्थीत चालावे असे आम्हालाही वाटते पण सरकारने शेतकऱ्यांना समजून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम आदी नेते उपस्थित हाेते.

Web Title: Uddhav Thackeray statement on farmers loan waiver