अभिनंदनीय! वर्धा जिल्ह्यात नवीन उमेद, उद्योग विकास केंद्राचा श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाची सुरुवात वर्धा जिल्ह्यात सेलू, देवळी, समुद्रपूर आणि वर्धा या चार तालुक्‍यात झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात महिलांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

वर्धा : महिलांनाही उद्योग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जातात. त्यातीलच एक म्हणजे उमेद. उमेदच्या माध्यमातून महिला समुहांना उद्योगाचे प्रारंभिक ज्ञान आणि उद्योगासाठी भांडवल मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाची सुरुवात वर्धा जिल्ह्यात सेलू, देवळी, समुद्रपूर आणि वर्धा या चार तालुक्‍यात झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात महिलांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. सेलू तालुक्‍यात तालुका स्तरावर तालुका उद्योग विकास केंद्राची सुरूवात दिनांक 15 जुलै 2020 ला करण्यात आली आहे. उद्योग विकास केंद्राची सुरुवात करण्यात महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा अग्रेसर आहे. आणि या उपक्रमाची अंमलबजावणी करणारा सेलू तालुका पहिला आहे.

उद्योग विकास केंद्राद्वारे महिलांच्या नवीन उद्योग व्यवसायाचा आराखडा तयार केला जाईल, तसेच भांडवल सुलभीकरण केले जाईल, बाजारपेठ अभ्यास, उद्योग व्यवसायाबाबत कायदेविषयक बाबींची पूर्तता, नवीन बाजारपेठेची जोडणी करणे, सनियंत्रण करणे, व्यवसाय जोडणी, नवीन तंत्रज्ञान व व्यवसाय कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे इत्यादी प्रकारची सर्व सेवा देण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -  सडकछाप मजनूला तिने घडवली जन्माची अद्दल, वाचा काय झाला प्रकार...
उद्योग विकास केंद्राची सुरुवात दिनांक 15 जुलै 2020 ला सेलू तालुक्‍यात करण्यात आली. सदर केंद्राचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याच्या उमेद अभियानाच्या व्यवस्थापक श्रीमती स्वाती वानखेडे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा व्यवस्थापक रवि लाटेलवार , उद्योग विकास केंद्राच्या अध्यक्ष श्रीमती शुभांगी वाटकर ,सचिव ज्योती खोब्रागडे, उपाध्यक्ष छायाताई तराडे, सेलू तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती अंजली बारई , तालुका समन्वयक दीप्ती नागमोते व गौरव देहान्कर, प्रकाश पोलकरे ,राहुल गुप्ता इत्यादींच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. यावेळी उद्योग विकास केंद्राचे सर्व बिडीएसपी उपस्थित होते. उमेदच्या निमित्ताने महिलांसाठी उद्योग क्षेत्राची दारे खुली झाली आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UMED kendra stats in Wardha district