esakal | काकानेच केला बारा वर्षीय पुतणीवर बलात्कार; गोंडपिपरी तालुक्यातील घटना  
sakal

बोलून बातमी शोधा

Uncle misbehaves with 12 year old girl at chandrapur district

घरात आजोबाचा मृत्यू झाला. यानंतर रिजीरिवाजानूसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयतीसाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असतांना काकाने बारा वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली.

काकानेच केला बारा वर्षीय पुतणीवर बलात्कार; गोंडपिपरी तालुक्यातील घटना  

sakal_logo
By
संदीप रायपूरे

गोंडपिपरी(चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्या पासून दहा किलोमीटर अंतरावर येना बोथला गावात मोरेश्वर राऊत यांच्या वडिलांचे काल निधन झाले दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी पाण्यासह जेवण करायला बसले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतनी वरती काळी नजर ठेवली. पाहुण्याला जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर निघाली आणि नराधम काकाने तिच्यासोबत संतापजनक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे.  

घरात आजोबाचा मृत्यू झाला. यानंतर रिजीरिवाजानूसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयतीसाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असतांना काकाने बारा वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली. तिला ओढत घराशेजारी असलेल्या बांबुच्या रांजीत नेले आणि तिथेच तिच्यावर बलात्कार केला. गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात काल रात्री साडेनउ वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला.

अधिक वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी कमलाकर राऊत याने तिला ओळखत घराजवळच असलेल्या सांदवाडीत नेले व तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला काही वेळातच मुलीचे वडील मोरेश्वर राऊत हे घराबाहेर निघाले असताना त्याला आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असतात घटनास्थळावरून आरोपी कमलाकर राउत यांनी पळ काढला. 

जीवे मारण्याची दिली धमकी 

मुलीची अवस्था पाहून वडील चक्रावून गेले घरी आणत तिला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर बळजबरीने ओळखत नेत बलात्कार केल्याची माहिती तिने घरच्यांना सांगितली. एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत यांनी माझ्यावरती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता व ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारेल अशी धमकी सुद्धा दिली होती त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना हि बाब सांगितली नाही.

लपून बसलेल्या नराधमाला अटक 

मुलीवरती झालेला अत्याचार पाहून आईवडिलांनी लगेचच रात्री अकरा वाजता गोंडपिपरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप दुबे यांनी आपल्या सहका-यासह येनबोथला गाव गाठले व गावापासून एक किलोमीटर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ लपून असलेल्या कमलाकरला ताब्यात घेत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. 

पीडित मुलीला मेडिकल चेकअप करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे सदर आरोपीविरुद्ध ३७६,३७६(२)(प्)(छ)(थ्)५०६, कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोस्को टीम राजुरा यांच्याकडे तपास दिला आहे.  सदर घटनेची माहिती मिळताच मूलचे उपविभागीय अधिकारी अनुज तरे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रकरणाची माहिती घेतली यावेळी गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे, पोलिस हवालदार अनिल चव्हाण, प्रेम चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

घरातील प्रमुख माणसाच्या मृत्यूनंतर त्याच रात्री बारा वर्षाच्या चिमुकलीवर बलत्कार करणाऱ्या काकाच्या कृत्याबाबत तालुक्यात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या नराधमावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आता समोर येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ