अनियंत्रित बसने युवकाला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नागपूर : शहर वाहतूक करणारी भरधाव "आपली बस' अनियंत्रित होऊन तिने रस्त्यावरून पायी जात असलेला युवकाला चिरडले. या घटनेत तीन ते चार दुकानांचेही नुकसान झाले. हा अपघात रविवारी (ता.6) रात्री अकरा वाजताच्या सुमारास मारवाडी चौकात झाला. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संजय नागोराव राऊत (वय 32, रा. मुदलीयार चौक) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत हा कळमना येथे हमालीचे काम करीत होता. रविवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास मारवाडी चौकातील हॉटेल मदिनासमोरून जात होता. त्याच सुमारास शांतीनगरकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या एमएच 31 एफसी 3570 क्रमांकाच्या शहर बसने संजयला धडक दिली. या अपघातात संजय जागीच ठार झाला. लकडगंज पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून बसचालक रामदास तुळशीराम भगत (रा. जय अंबेनगर, पारडी) याला अटक केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The uncontroled bus crushed young man