नोकरीच्या नावे ठगवले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नागपूर - एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक काल सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रकारामुळे सीताबर्डीत दुपारी गोंधळाचे वातावरण होते. 

नागपूर - एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक काल सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रकारामुळे सीताबर्डीत दुपारी गोंधळाचे वातावरण होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कबीर इन्फोटेक नावाच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशिक बनसोड आणि त्याच्यासोबत काम करणारे प्रशांत बोरकर, अशिल शेख, निशांत नखाते, नोमा खान व मोना यादव यांनी शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची तक्रार पीडितांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात दिली. पीडित युवक लोकेश फुलारिया, सचिन पराते, राहुल माहूळ, नीलेश झोटिंग, दिपेश कडवे, वेद बुध, आतिक अली यांच्यासह जवळपास 200 युवक आज सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी तक्रार अर्ज तयार करून सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांना दिला. मात्र, ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे ठाण्यात तणाव झाला. मात्र, खराबे यांनी युवकांची समजूत घालून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. युवकांची शेवटी तक्रार सीताबर्डी पोलिसांनी घेतली. 

दोन वर्षांचा बॉंड 
कबीर इन्फोटेक कंपनीचा मुख्य प्रशिक बनसोड व त्याची पत्नी हे बंटी-बबली म्हणून चर्चित आहेत. हे दोघेही बेरोजगार इंजिनिअर विद्यार्थ्यांना टार्गेट करीत होते. कंपनीचे मुख्य कार्यालय इम्पेरियल प्लाझा नावाने सीताबर्डीत आहे. त्यांचे प्रशिक्षण केंद्र रविनगरातील कोपा कॅफेच्या पाचव्या माळ्यावर आहे. कंपनीच्या वतीने एका विद्यार्थ्याकडून 1 ते दीड लाख रुपये घेतले जात होते. त्यांना सांगितल्या होते की, हिंगण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत त्यांना नोकरी दिली जाईल. त्यांच्याकडून काल्पनिक असलेल्या कंपनीचा दोन वर्षांचा बॉंड लिहून घेतला जात होता. सुरुवातीला 20 हजार रुपये महिना पगाराचे आमिषही दाखविण्यात येत होते. 

प्रशांत आणि मोना देत होते प्रशिक्षण 
पीडित बेरोजगारांच्या माहितीनुसार, प्रशांत आणि मोना हे दोघे ठगवलेल्या बेरोजगारांना सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत प्रशिक्षण देत होते. प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक बनसोड हा नोकरी देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. जुलै 2018 मध्ये काही युवकांना कबीर इन्फोटेकने नोकरीचे नियुक्‍तिपत्र दिले. एका कंपनीत फ्रीज बनविण्याचे मजुराप्रमाणे काम देण्यात आले तर मुलींना लेडीज टेजर गन बनविण्याच्या नावाखाली कंपनीत काम करण्यास सांगितले जात होते. बनसोड याने वेतनाच्या नावावर दिलेला चेकही बाऊन्स झाल्याचा आरोप युवकांनी केला. 

प्रशिक बनसोड महागुरू 
प्रशिकने सर्वप्रथम मेणबत्ती बनविण्याचा उद्योग सुरू केला होता. औरंगाबादमध्ये 650 गुंतवणूकदारांना कोट्यवधीने चुना लावून तो पळाला होता. औरंगाबाद पोलिसांनी प्रशिकला छत्तीसगडमधून अटक केली होती. प्रशिकने नागपुरातही मेणबत्तीच्या नावावर अनेकांना गंडा घातला आहे. यासह त्याने महाराष्ट्र, गोवासह अन्य राज्यांतील युवकांची फसवणूक केल्याचा आरोप पीडित युवकांनी केला. 

Web Title: Unemployed fraud in Nagpur