बेरोजगार झालेले म्हणतात, घरी परतलो, मात्र कामाचे काय ? 

file photo
file photo
Updated on

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणे येथील कंपन्यांतून परतलेल्या कामगारांना आता रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. स्थानिक उद्योग समूह या मंडळींना रोजगार देण्यास सक्षम नसल्याने शेकडो युवकांना आता स्वयंरोजगाराची कास धरावी लागणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटात उद्योग जगत ठप्प झाले आहे. लॉकडाउनमुळे मुंबई, पुण्यातील अनेक कंपन्यांनी टाळेबंदी जाहीर केली तर अनेकांनी कामगार कपात केली आहे. कोरोनाच्या भितीमुळे मागील दोन ते अडीच महिन्यात हजारो अमरावतीकर युवक तसेच कामगार स्वगृही परतले आहेत. स्थानिक एमआयडीसीमध्ये जवळपास 750 मध्यम तसेच लघुउद्योग आहेत. लॉकडाउनच्या काळात ते बंदच होते, आता शासनाने पुन्हा परवानगी दिली, मात्र 50 टक्के कामगारांची अट घातली आहे. पर्यायाने याच परिस्थितीत अमरावतीमधील उद्योग सुरू आहेत. मात्र दुसरीकडे मुंबई, पुणे येथील बेरोजगारांच्या झुंडी शहर व जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांच्या समायोजनाचा मोठा प्रश्‍न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. एमआयडीसीमधील उद्योग या कामगारांना सामावून घेण्याइतपत सक्षम नाहीत. त्यामुळे या मंडळींना स्वयंरोजगार, शेती किंवा खासगी नोकरीशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही. 

स्थानिक उद्योग बेरोजगारांना रोजगार देण्याइतपत सक्षम नाहीत. एमआयडीसीतील उद्योजकांना आताही 50 टक्के कामगारांवरच काम निभवावे लागत आहे. शनिवार, रविवार जनता कर्फ्यू आहे. या काळात एमआयडीसी मात्र सुरू असते, परंतु पोलिस विभाग उद्योजकांसमोर तांत्रिक अडचणी निर्माण करतात. स्थानिक बेरोजगारांसमोर स्वयंरोजगाराशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही. 
- किरण पातूरकर, अध्यक्ष, एमआयडीसी इंन्डस्ट्रीयल असोसिएशन

सध्याच्या स्थितीत साहित्य तयार करण्यास उद्योजक फारसे इच्छुक नाहीत. प्रॉडक्‍ट विकल्याच गेले नाही तर निर्मिती का करायची असा प्रश्‍न उद्योजकांना पडला आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये बेरोजगारांच्या रांगा लागतील असा अंदाज बांधणेच चुकीचे आहे. कारण मुंबई पुण्यातील जे कामगार किंवा कर्मचारी मोठ्या पगारावर नोकरीला होते ते अत्यल्प पगारावर काम करण्यात कसे तयार होतील?. 
- अविनाश कानतुटे, उद्योजक, अमरावती. 

—संपादन : चंद्रशेखर महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com