पत्नी गावाला गेली आणि त्याने नको ते केले

raped
raped

अमरावती : वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला जगात तोड नाही. पित्याचे आपल्या मुलावर जेवढे प्रेम असते तेवढेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्रेम तो आपल्या मुलीवर करतो. तिचे सर्व लाड तो पुरवितो. मोठी होऊन लग्न होईपर्यंत तळहातीवरील फोडाप्रमाणे तिला जपतो. मुलगी लग्न होऊन सासरी जाताना जेव्हा ती आपल्या जन्मदात्याला बिलगते तेव्हा त्याचे हृदय दाटून आल्याशिवाय राहत नाही. डोळ्यांतील अश्रूंना तो रोखू शकत नाही. अशा या पवित्र नात्याला एका राक्षसी प्रवृत्तीच्या बापाने काळिमा फासली. पत्नी घरी नसल्याची संधी साधून त्याने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. 

धाक दाखवून केला अत्याचार

ही घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रविवारी, 29 डिसेंबर रोजी घडली. त्याचे झाले असे, त्या नराधम माणसाची पत्नी बाहेरगावी गेली होती. घरी लहान मुलगा, 15 वर्षीय मुलगी आणि तो स्वतः असे तिघेच होते. रविवारी रात्री दोन्ही मुले झोपी गेली. मात्र, या नराधमाच्या डोक्‍यात काही वेगळेच शिजत होते. नात्याची पर्वा न करता त्या रात्री धाक दाखवून त्याने आपल्याच मुलीवर दोनवेळा बलात्कार केला. आपले राक्षसी कृत्य उघडे पडू नये म्हणून त्याने मुलीला याबाबत कुणाजवळ सांगू नको म्हणून धमकावले. सांगितल्यास मी फाशी घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. 

न्यायालयीन कोठडीत रवानगी 

वडिलांनी केलेला अत्याचार सहन करीत मुलगी दोन दिवस गप्प बसली. त्यानंतर तिने गावचे पोलिस पाटील आणि इतर महिलांना याबाबत सांगितले. त्यांनी दिलेल्या हिमतीमुळे मंगळवारी, 31 डिसेंबर रोजी मुलीने आपल्याच पित्याविरुद्ध तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून त्या नराधम बापाविरुद्ध पित्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि काही तासातच त्याला अटक केली. बुधवारी (ता. एक) त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com