esakal | माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण; शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी असे केले अनोखे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

strike.jpg

शेतकरी कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाच्या झळा सोसत असताना आता कोरोना विषाणूंच्या महाभयंकर संकटाने शेतकरी हैराण झाला आहे. शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण; शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी असे केले अनोखे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहकर (जि.बुलडाणा) : पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहेत शेतकर्‍यांना बी-बियाणे खते खरेदी करण्यासाठी कर्जाची नितांत गरज आहे. बँकांकडून शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज पुरवठा करावा यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण या माध्यमातून माजी मंत्री रयत क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनात रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ता जितू अडेलकर यांनी परिवारातील सदस्यांसह अंगणामध्ये 15 मे ला ताळेबंदीचे तंतोतंत पालन करून आंदोलन केले.

शेतकरी कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाच्या झळा सोसत असताना आता कोरोना विषाणूंच्या महाभयंकर संकटाने शेतकरी हैराण झाला आहे. शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. पीक लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. अशातच खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना, बँकेकडून शेतकर्‍यांना पीककर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत आहे. अतिरिक्त पीककर्ज देण्यास बँका विलंब करीत आहेत.

आवश्यक वाचा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी; नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

मागील वर्षीचा खरीप हंगाम दुष्काळात गेला. रब्बी हंगाम अतिवृष्टीत सापडला व आता कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे शेतकर्‍यांकडे फारसे उत्पादन तयार झाले नाही व जे झाले ते विकले जात नाही. शेतकर्‍यांकडे पुढील पिकाचे बियाणे, खते, औषधे, मजुरी यासाठी खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी कर्जासाठी बँकेत गेले असता काही शेतकर्‍यांना कर्ज माफी मध्ये न बसलेल्यांना मागील थकबाकीदार दाखवून कर्ज नाकारले जात आहे.

हेही वाचा - वाह! याला म्हणताता वेळेचा सदुपयोग, तो पण चक्क शाळेत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींकडून...वाचा

अशा कठीण परीस्थीत शेतकरी मेटाकुटीस आला आहे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा शेती पंपाचे वीजबिल माफ करा. दुधाला प्रती लिटर पाच रु अनुदान द्या. कांद्याला प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान द्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या शेतकर्‍याचे फळाचे भाजीपालाचे नुकसान झाले त्याचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्या शालेय विद्यार्थीची फी माफ करा अशा विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ता जितुभाऊ अडेलकर यांनी आंदोलन केले.