राज्यातील तीन विद्यापीठांत 'भाऊ'चा धक्का!

विवेक मेतकर
बुधवार, 23 मे 2018

अकोला - राज्यातील तीन विद्यापीठांत बांबू हॅंडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट अर्थात "भाऊ' सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ता. 1 ऑगस्टपर्यंत हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

या तीन विद्यापीठांची निवड
* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अकोला - राज्यातील तीन विद्यापीठांत बांबू हॅंडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट अर्थात "भाऊ' सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ता. 1 ऑगस्टपर्यंत हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

या तीन विद्यापीठांची निवड
* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
* महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

प्रत्येकी 35 लाखांचा निधी
राज्यातील तीन विद्यापीठांमध्ये "भाऊ' केंद्र सुरू करण्यासाठी प्रत्येकी 35 लाख रुपयांचा खर्च येतो. हा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत विद्यापीठांना उपलब्ध करून दिला जाईल. जुलै महिन्यात पुरवणी मागणीद्वारे हा निधी त्यांना उपलब्ध करून दिला जाईल.

केंद्राची तरतूद
केंद्र सरकारने नुकतेच बांबू मिशनसाठी एक हजार 290 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यातील अधिकाधिक निधी महाराष्ट्राला मिळेल, यादृष्टीने वन विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत.

उत्पादन ते विक्री केंद्र
जगामध्ये बांबूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात, याचा व उत्पादन सुरू झाले की त्याच्या विक्रीसाठी कोणाबरोबर सहकार्य करार करता येईल, याचा अभ्यास केला जावा. उत्पादन केंद्रे ते विक्री केंद्र अशी याची साखळी विकसित केली जावी.

रोजगाराची सांगड
विद्यापीठ कॅम्पस ही रोजगार निर्मितीची केंद्रे झाली पाहिजेत. ही केंद्रे सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची मुद्रा योजनेची सांगड घालून स्वयंरोजगाराची दालने उपलब्ध करून दिली जावीत. बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तुंची माहिती देणारी एक बांबू माहितीकोश तयार केला जावा. बांबू मंडळ, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या संकेतस्थळावर हा कोश उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे बांबू प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना एक समग्र मार्गदर्शन मिळू शकेल.

Web Title: university bamboo handicraft and art unit bhau