विद्यापीठांच्या परीक्षांचा मुहूर्त मार्चपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सात मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रमाणपत्र परीक्षा असली तरी, २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यापासून महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येईल. परीक्षा एप्रिल महिन्यापर्यंत चालतील. ३० जूनपर्यंत पदवी अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षाचे सर्वच निकाल लावण्यात येणार आहेत. 

दरवर्षी पाच टप्प्यांमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात येतात. मे महिन्यात सुरू होणारा  विद्यापीठाचा परीक्षांचा शेवटचा टप्प्यातील परीक्षा जून-जुलैपर्यंत चालत असल्याने निकालासाठी ओरड होते. त्यामुळे यंदा एप्रिल महिन्यातच परीक्षा संपविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन केले. सात मार्चच्या परीक्षांमध्ये असलेल्या प्रमाणपत्र परीक्षांसोबत सेमिस्टर पॅटर्नच्या अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यांमध्ये पदवी अभ्यासक्रमातील प्रथम आणि तृतीय वर्षाच्या सेमिस्टरमधील परीक्षा घेण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी,  फार्मसी आणि एमबीए अभ्यासक्रमातील परीक्षांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि नव्या पॅटर्नचा समावेश असलेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षांचा समावेश राहील. यात ‘स्पेशलायझेशन’ असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचाही समावेश केला आहे. ४५ दिवसांच्या आत जास्तीत-जास्त अभ्यासक्रमाचे निकाल घोषित करण्याचे लक्ष्य विद्यापीठासमोर आहे.

परीक्षा आणि निकालाचे नियोजन करण्याच्या दृष्टीनेच चार टप्प्यातील परीक्षा मे महिन्यापूर्वीच आटोपण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, पदवी आणि पदव्युत्तरच्या सप्टेंबरपर्यंत जाणाऱ्या प्रवेशप्रक्रिया जुलैमध्ये संपण्यात मदत होईल. 
- डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Web Title: university exam in march