हिंगणा शहरात अज्ञात तापाची साथ 

file Photo
file Photo

हिंगणा (जि.नागपूर)  : पावसाळा सुरू असल्याने शहरात सर्वत्र कचरा वाढलेला आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शहरात अज्ञात तापाची साथ सुरू झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे फॉगिंग मशीन उपलब्ध असतानाही अद्याप फॉगिंग केले नाही. यामुळे जनतेच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. 
हिंगणा नगरपंचायत क्षेत्रात 17 वॉर्ड आहेत. सद्यस्थितीत लोकसंख्या जवळपास दहा हजारांच्या घरात पोहोचली आहे. शहरातील मोकळ्या जागेवर पावसाळ्यामुळे हिरवा कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायंकाळी सहा वाजतानंतर डासांची झुंड सर्वत्र दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात अज्ञात आजाराची साथ पसरली आहे. अनेक घरांमध्ये तापाचे रुग्ण दिसून येत आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केले आहे. नगरपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्चून फॉगिंग मशीन खरेदी केल्या. मात्र, डासांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही धूळखात पडलेल्या फागिंग मशीन अद्यापही बाहेर निघाल्या नाही. यामुळे जनतेत रोष व्यक्त केला जात आहे. नगरपंचायत प्रशासनाने तातडीने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात फॉगिंग करणे गरजेचे आहे. नगरपंचायत प्रशासनातील पदाधिकारीही सुस्त असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या आरोग्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने आता तरी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनतेत जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com