दारू पाजून तरुणाचा बालकावर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल

साईनाथ सोनटक्के
Saturday, 24 October 2020

दारू प्यायल्यानंतर काही वेळातच बालकाची शुद्ध हरपली. त्यानंतर चिंटू सोनी याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडित बालकाने कुटुंबीयांना दिली.

चंद्रपूर : पाणी प्यायला देण्याच्या निमित्ताने बालकाला घरात नेले. त्यानंतर दारू पाजून शुद्दी हरपलेल्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. अष्टभुजा वॉर्डात ही घटना घडली असून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिंटू सोनी, असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या शेजारी पीडित बालक कुटुंबीयांसह वास्तव्यास असतो. दोन दिवसांपूर्वी रात्रीचे जेवण झाल्यानंतर चौकात पीडित बालक गेला. काही वेळानंतर चिंटू सोनी याने त्या पीडित बालकाला शौचास जाऊ असे म्हणून दोघेही निघाले. रस्त्यात बालकाने पाणी पिण्यासाठी घरी जातो, असे सांगितले तेव्हा चिंटूने आपल्या घरी पाणी प्यायला नेले. यावेळी त्याने पिण्याच्या पाण्याऐवजी दारू पाजली. 

हेही वाचा - डोक्यावर पदर, ना पाहुण्यांच्या बैठकीत जाण्याची मुभा; तरीही देशमुख घराण्यातील महिला सायकल दुरुस्ती...

दारू प्यायल्यानंतर काही वेळातच बालकाची शुद्ध हरपली. त्यानंतर चिंटू सोनी याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडित बालकाने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर भादंवि 377, पोस्को, ऍट्रॉसिटी अ‌ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, वृत्तलिहिस्तोवर अत्याचार करणाऱ्यास अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हेही वाचा - सुमठाण्याच्या आधुनिक रोपवाटिकेत अंधाराचे साम्राज्य, वन्यप्राण्यांचा वावर; सांगा,...

छेड काढणाऱ्याला मजूर महिलांनी दिला चोप -

अमरावती : इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजूरी करणाऱ्या महिलेशी असभ्य वर्तन करून छेडखानी करणाऱ्या व्यक्तीला काम करणाऱ्या इतर महिलांनीच चोप दिला. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

राजापेठ ठाण्याच्या हद्दीत छत्रीतलाव मार्गावर एका इमारत बांधकामाच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला ही घटनास्थळी पाणी टाकण्याचे काम करीत होती. संशयित आरोपी गोपाल यादव (रा. देशपांडे प्लॉट)याने पीडितेला बोलविले. त्यानंतर थेट शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने गोपालला त्रास न देण्याबाबत सूचित केले होते. त्याच्या वर्तनात फरक पडला नाही. उलट त्याने पीडित व बांधकाम कंत्राटदार आपले काहीच बिघडवू शकत नसल्याची धमकी दिली. पीडितेसोबत काम करणाऱ्या इतर महिलेशीही गोपाल यादवने असभ्य वर्तन केले. त्यामुळे तेथे उपस्थित महिला मजुरांनी गोपाल यास घेरुन आधी चोप दिला. गोपालने सुद्धा एका महिलेच्या श्रीमुखात लगावली. अचानक घडलेल्या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली. महिलांनी गोपाल यास पकडल्यानंतर राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून यादवविरुद्ध विनयभंग, जीवे मारण्याची दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unnatural abuse of minor child in chandrapur