Hail Storm : पाऊस गारपिटीने केनवडला झोडपले; गारपीट पावसाने नुकसान

वाशीम जिल्ह्य़ातील मालेगाव तालुक्यातील केनवड परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस व अचानक गारांचा तडाखा सुरु झाल्याने टीनपत्रे उडाली, तर शेत पिकांचेही मोठे नुकसान झाले.
agriculture loss in kenwad
agriculture loss in kenwadsakal

केनवड - वाशीम जिल्ह्य़ातील मालेगाव तालुक्यातील केनवड परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस व अचानक गारांचा तडाखा सुरु झाल्याने टीनपत्रे उडाली, तर शेत पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शिरपूर वाशीम येथेही पावसाने हजेरी लावली. केनवड येथे आज शुक्रवारी सकाळपासून पावसाळी वातावरण होते तर दिवसभर लाईनही गेलेली होती.

दुपारी 4 वाजेनंतर जोरात हवा सुटून पाऊसही सुरु झाला. जोराच्या वाऱ्यात गारांचा वर्षाव सुध्दा झाला. जवळपास अर्धा तास वारा पाऊस व गारपिट सुरूच होती. अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले

शिरपूर परिसरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात पुन्हा 12 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास वादळीवारासह मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने हळदी वरील ताडपत्री उडून गेल्या. व अनेक शेतकऱ्यांच्या हळदी पाण्यामध्ये भिजल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच कांदा बीज उत्पादन पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने कांद्याचे फुले तुटून खाली पडले व मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा या अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीला आला आहे.

शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचवण्यासाठी शासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा, नुकसान ग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे व तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com