Untimely Rain : झगडपाडा, खोकरविहीर परिवारास चक्रीवादळ सह जोरदार अवकाळीचा तडाखा

झगडपाडा येथील रहिवाशी चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरावरील पत्रे उडविले असून सर्व पत्र्याचे नुकसान झाले आहे.
Untimely Rain
Untimely Rainsakal

सुरगाणा - तालुक्यातील बा-हे, अंबोडे परिसरातील आंबुपाडा, बेडसे, ठाणगाव, गुरु टेंभी, झगडपाडा, खोकरविहीर, कोडीपाडा, हस्ते, जाहले या गावांना दुपारी तीन ते सव्वातीन वाजेच्या सुमारास जोरदार चक्री वादळासह अवकाळी पावसाने एक ते दीड तास हजेरी लावल्याने काही घरांचे अतोनात नुकसान झाले असून, आंबा फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

झगडपाडा येथील रहिवाशी चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरावरील पत्रे उडविले असून सर्व पत्र्याचे नुकसान झाले आहे. गावातील काहींच्या घरावरील कौलांचे नुकसान झाले आहे. तुळशीराम जाधव, युवराज घांगळे, हिरामण महाले यांच्या घराचे नुकसान झाले.

तर झगडपाडा येथील शेतकरी प्रकाश घांगळे, देवराम राऊत, जयराम घांगळे, हिरामण महाले, कोडीपाडा येथील शेतकरी कांतीलाल गावित, राकेश मौळे, विठ्ठल गावित, वसंत गवळी, हिरामण गावित, पांडुरंग गावित, जाणू चौधरी, हंसराज महाले, जनार्दन गावित, चंद्रकांत गावित तर आंबुपाडा येथील यशवंत वाघमारे, जगदीश, दत्तू वाघमारे, सीताबाई हाडळ, आंबु डगळे, यांचे आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे. तर येथील पुंजा मिरगे, सुकर वार्डे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील इतर शेतकऱ्याचे आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया -

'माझ्या कोडीपाडा या गावी शेतात ३५ ते ४० केशर, हापूस, राजापुरी हे आंबे आहेत. मला दरवर्षी यापासून नव्वद हजार ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळत होते. या वर्षी अवकाळी पावसाने चक्रीवादळ झाल्याने खुप नुकसान झाले आहे. याचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी.'

- चंद्रकांत गावित, कोडीपाडा आंबा फळबाग शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com