अभ्यासात सासत्य हवे, युपीएससी क्रॅक करणे कठीण नाही! : समीर महाजन

विवेक मेतकर
बुधवार, 10 एप्रिल 2019

अकोला : ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।। या तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवून वाडेगाव सारख्या छोट्या गावातून देशपातळीवर खडतळ स्पर्धा असलेली युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या समीर महाजन याच्याशी मंगळवारी (ता. 9) संवाद साधला.

अकोला : ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।। या तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवून वाडेगाव सारख्या छोट्या गावातून देशपातळीवर खडतळ स्पर्धा असलेली युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या समीर महाजन याच्याशी मंगळवारी (ता. 9) संवाद साधला.

मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता मनापासून अभ्यास केला तर यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे खूप अवघड नाही. अनेकदा जे सोपे आहे तेही अवघड असल्याचे चित्र निर्माण केले जाते. त्याकडे लक्ष न देता ध्येय्य गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या समीर महाजन यांनी केले. इंटरनेटच्या वापरासंदर्भात बोलताना तो म्हणाला, इंटरनेटमुळे अभ्यासाला उपयुक्त अशी खुप माहिती मिळविता येते. मात्र, ते वापरताना विद्यार्थी भरकटण्याची शक्यता मोठी असते. 2016 ला पहिला प्रयत्न केला. मात्र, नोकरीमुळे यश प्राप्त करता आले नाही. आपल्यातील उणीवा भरून काढत जीद्दीने तयारीला लागला असल्याचे तो सांगतो.

आठवीपर्यंत मराठी माध्यमातून अभ्यास केल्यानंतर नववीपासून सेमी इंग्रजी माध्यम त्याने स्विकारले. दहावीला तो गुणवत्ता यादीत झळकला. बारावीनंतर पुणे येथे इलेक्ट्रॉनीक्स आणि टेलीकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. एमबीए केले, नंतर चेन्नई येथे विप्रो आणि नंतर ओरीसामध्ये कोल इंडीयामध्ये नोकरू करू लागला. नोकरी करतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेला आवडीचा विषय राज्यशास्त्राचा अभ्यास करू लागला. अभ्यास करताना युट्यूबवरून संदर्भ मिळविले. समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील फरक पाहून त्याला युपीएससी परीक्षेची प्रेरणा मिळाली.

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले वडील आणि गृहिणी असलेल्या आईने नेहमीच प्रेरीत केले. अभ्यासाच्या दरम्यान मित्रांचीही खूप मदत झाल्याचे समीर सांगतो. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तो शासकीय सेवेत रूजू होईल. मात्र, त्याने मिळविलेल्या यशाने जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा मिळाली. समीरने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समीरने मिळविलेल्या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात निश्चितच मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Web Title: UPSC guidance by Sameer Mahajan at Akola