"स्टार्ट अप'मध्ये अमेरिकेची गुंतवणूक

"स्टार्ट अप'मध्ये अमेरिकेची गुंतवणूक

नागपूर  : "स्टार्ट अप'च्या संकल्पनेने भारावलेल्या ब्रह्मपुरीतील एका तरुणाने देशातल्या नामांकित संस्थेतील नोकरीवर तुळशीपत्र ठेवत काही तरी नवीन करण्यात समाधान मानले. प्रचंड मेहनतीने त्याने तयार केलेल्या सुट्या भागाला आता मॅनमार, नेपाळ, बांगलादेश, आफ्रिकासह लॅटिन अमेरिकेतील देशांमधून मागणी येत आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या व्यवसायात अमेरिकेतील एका उद्योजकाने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.साहिल चावलाने 2013 साली कॉम्प्युटर सायन्स विषयात अभियंता झाला. यानंतर चांगल्या संस्थेच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी ठेवलेला ब्रह्मपुरी येथील व्यवसाय सांभाळण्याचा प्रस्ताव त्याने नाकारला. अखेर काही नवीन करण्याच्या भावनेने शहरात स्थिरावण्याचा निर्णय घेतला. एका पंपावर पेट्रोल भरताना कर्मचाऱ्याने कामचुकारी केल्याचे त्यांच्या ध्यानात आले. पण हटकायचे कसे? हा विचार घेऊन साहिल घरी परतला. ही घटना छोटीशी असली तरी, पुढे याच घटनेने देशाला मोठा संशोधक दिला. साहिलने 2014 साली त्याने "टिसेकंड इन्व्हेंशन इन प्रोग्रेस' नावाने व्यवसाय सुरू केला. वाहनात भरले जाणाऱ्या पेट्रोलचे योग्य प्रमाण तपासणारी "फ्युएल मॉनिटरिंग सिस्टीम' तयार केली. त्याचे नाव "ई फ्यूनल' व "स्मार्ट डीजी' ठेवले. पेटंट थेट अमेरिकेत नोंदवले. मोबाईल ऍप मार्फत पेट्रोलचे प्रमाण थेट वाहनमालकाच्या मोबाईलवर दिसेल अशी यंत्रणा तयार केली. मोबाईल हरवल्यास काय? म्हणून पार्टमध्ये स्वतंत्र मेमरी बसविण्यात आली. त्यासाठी पार्टला बॅटरी बॅकअप देण्यात आले. त्यामुळे वाहनाच्या इंधन टाकीत जाणारे पेट्रोलचे प्रमाण सॅलेलाइटच्या मदतीने वाहनचालकाच्या मोबाईलवर दिसणार आहे. त्यांच्या या संशोधनावर व्यावसायिकांनी विश्‍वास ठेवला आणि सुमारे पाच कोटीहून अधिक गुंतवणूक करण्याची दर्शवली. महत्त्वाचे म्हणजे यातील निम्मी गुंतवणूक अमेरिकेतील एका उद्योजकाने दिली असल्याचे साहिलने सांगितले. या संशोधनाचा सर्वाधिक उपयोग शासकीय वाहनांना तसेच वाहतूक क्षेत्रातील उद्योगांना होणार आहे. बऱ्याचदा वाहनचालक किंवा नियंत्रक पेट्रोलचे बिल फुगवून अतिरिक्‍त कमाई करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या प्रकारांना या संशोधनामुळे खीळ बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com