वृक्ष वाचवण्यासाठी संक्रांतीच्या सुगड्यांचा वापर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

सुगड्यांना झाडांच्या बुंध्यापाशी एका फुटावर खड्डा करून त्यात सुगडे ठेवल्यास व त्याला एक छिद्र पाडून त्यात कापसाची किंवा कपड्यांची वात लावली कि सुगड्यात भरलेले पाणी वृक्षांना सलाईन सारखे काम करते व यातील भरलेले पाणी जवळपास झाडांना जवळपास दोन ते तीन दिवस सहज पुरते.

वाशीम : एस. एम. सी. इंग्लिश स्कूलचे इंग्रजीचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी व प्राचार्य मीना उबगडे यांच्या कल्पनेतून वृक्ष वाचवण्यासाठी सुगड्यांचा वापर करण्यात आला.

       मकर संक्रांती व सुगडी यांचे अतूट नाते आहे. मकर संक्रांतीला सुवासिनींना सुगड्यांचे वाण देऊन हा सण साजरा केला जातो. पूर्वी या सुगड्यांचा वापर पुढे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी केला जायचा. परंतु आजच्या आधुनिक काळात घरोघरी फ्रीज, रेफ्रिजरेटरचा वापर वाढल्याने सुगडी दुर्लक्षित झाली आहेत. याच सुगड्यांचा वापर करून एस. एम. सी. इंग्लिश स्कूलने वृक्ष वाचवण्यासाठी सुगड्यांचा वापर करण्याचा व याबाबतीत जनजगृती करण्याचा निर्णय घेतला.

        या अभिनव कल्पनेतून सुगड्यांना झाडांच्या बुंध्यापाशी एका फुटावर खड्डा करून त्यात सुगडे ठेवल्यास व त्याला एक छिद्र पाडून त्यात कापसाची किंवा कपड्यांची वात लावली कि सुगड्यात भरलेले पाणी वृक्षांना सलाईन सारखे काम करते व यातील भरलेले पाणी जवळपास झाडांना जवळपास दोन ते तीन दिवस सहज पुरते. आपण झाडांना पाईपद्वारे किंवा हाताने पाणी दिल्यास त्याचे जवळपास ९०% बाष्पीभवन होते. परंतु या पद्धतीचा अवलंब केल्यास हे पाणी हळूहळू झाडांच्या मुळांना उपयोगी पडते. वरील उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेऊन वृक्ष संवर्धनासाठी  व शेतीसाठी उपयोग करावा असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of pot to save the tree