वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पिवळा दिवा

file photo
file photo

नागपूर  : पाणीटंचाईवर मात देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्पात विदर्भातील वैनगंगा आणि नळगंगा नदीचा समावेश करण्यात आला असला तरी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने ही योजना तूर्तास थांबविण्यात आल्याची चर्चा आहे.विदर्भातील वैनगंगा (गोसेखुर्द)- नळगंगा (पूर्णा तापी) नदीजोड प्रकल्पाला राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने हिरवी झेंडी दखविली आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील वाहून जाणारे 1900 दलघमी पाणी विदर्भातील अन्य जिल्ह्यांत वळविण्यात येणार असून याचा संपूर्ण अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला. नदीजोड प्रकल्पातंर्गत गोसेखुर्दचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला देण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, बुलडाणा, अकोल्याचा समावेश आहे. यासाठी 8 हजार 294 कोटी रुपयांचा खर्चही अपेक्षित असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्याचा समावेश आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून हाती घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. यामुळे अमरावती विभागातील अनुशेष असणाऱ्या भागांना सिंचनाचा लाभ मिळेल. प्रकल्पामुळे तीन लाख हेक्‍टर क्षेत्रास सिंचनाला लाभ मिळण्याचा दावा करण्यात येत होता. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातंर्गत गोसेखुर्द प्रकल्पातील 600 दलघमी पाणी वळविण्यासंदर्भात व त्यामुळे किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. प्रकल्प मार्गी लागण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे, याचा सर्वांगीण दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आल्याची माहिती आहे. सध्याची पाणीबाणीची स्थिती पाहता हा प्रकल्प फार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पावर होणारा खर्च आणि आर्थिक परिस्थिती पाहता याला तूर्तास थांबविण्याच्या सूचना शासनाच्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
असा आहे वैनगंगा-नळगंगा प्रकल्प
महाराष्ट्र शासनाच्या विनंतीवरून राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने वैनगंगा (गोसेखुर्द)-नळगंगा (पूर्णा तापी) या विदर्भातातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नदीजोड सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण केले आहे. याअंतर्गत गोसेखुर्द प्रकल्पातील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वैनगंगा, वर्धा, पूर्णा (तापी) नद्यांच्या खोऱ्यातून वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात वळविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com