(Video) चंद्रपुरातील वामनपल्ली होते ब्रिटिशांचे आवडते शिकारीचे स्थळ 

नीलेश झाडे
Monday, 21 September 2020

ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा मोठी होती. घटदाट जंगल, सूर्य किरणांना अटकाव करणारे उंचउंच वृक्ष. अनेकांच्या जगण्याचे साधन येथील जंगल होते. वनसंपदेने नटलेल्या या वनात वन्यजीवांचा मोठा आवास होता. ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव आणि गोंडपिपरी तालुक्यात येणारे वामणपल्ली वनक्षेत्र " शूटिंग ब्लाॅक " म्हणून ओळखले जात होते.

धाबा (जि. चंद्रपूर) : ब्रिटिशकाळात चांदागडातील वने घनदाट अन भितीदायक होते. येथील उंच वृक्ष सूर्य किरणांना जमिनीवर पोहचू देत नव्हते. या किर्र जंगलात वन्यजीव मोठ्या संख्येने होते. हिस्त्रपशुंची शिकार करण्याची आवड असलेल्या ब्रिटिशांची येथे मोठी रेलचेल होती. चंद्रपूर जिल्हातील कन्हाळगावप्रमाणेच वामणपल्ली हे ब्रिटिशांचे आवडते शिकारीचे ठिकाण होते.  शिकारीला आलेले ब्रिटिश जिथे थांबायचे ती घरे आता मोडकळीस आली आहेत. मात्र. ब्रिटिशांनी केलेल्या शिकारींच्या कथा आजही येथील ज्येष्ठ नागरिकांच्या ओठांवर आहेत.

ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा मोठी होती. घटदाट जंगल, सूर्य किरणांना अटकाव करणारे उंचउंच वृक्ष. अनेकांच्या जगण्याचे साधन येथील जंगल होते. वनसंपदेने नटलेल्या या वनात वन्यजीवांचा मोठा आवास होता. ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव आणि गोंडपिपरी तालुक्यात येणारे वामणपल्ली वनक्षेत्र " शूटिंग ब्लाॅक " म्हणून ओळखले जात होते. शिकार करण्याचे परवाने येथे दिले जात होते. 

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

 

घनदाट जंगलालगत असलेल्या वामनपल्ली येथे वनविभागचे गेस्ट हाऊस होते. शिकार करण्यासाठी आलेले ब्रिटिश येथे मुक्काम करायचे. वनविभागाचे चौकीदारांना सोबत घेऊन ते जंगलात शिकारीला जात असत. आज गेस्ट हाऊस जमीनदोस्त झाले आहेत. ब्रिटिशांनी देश सोडला मात्र ब्रिटिशांच्या शिकारीचा थरारक कथा आजही गावात चर्चिल्या जात आहेत. 

वडिलांची ब्रिटिश काळात सेवा

वामनपल्ली गावातील फैका वेलादी , पांडुरंग वेलादी हे दोघे भावंडे ब्रिटिश काळात चौकीदार पदावर कार्यरत होते. गेस्ट हाऊसवर येणाऱ्या ब्रिटिशांची खाण्या पिण्याची ते व्यवस्था करायचे. वाघाला आकर्षित करण्यासाठी म्हैस, रेडा, बैलांना वाघाच्या भ्रमणमार्गावर ते बांधून ठेवायचे. बहुतांश शिकार या दोघांनी बघीतले आहेत. त्यांची मुले उध्दव वेलादी आणि मोतीराम वेलादी हे दोघेही वनविभागात चौकीदार पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते दोघे आता वामनपल्ली गावात राहतात.

जखमी वाघ अन भयभित ग्रामस्थ

एकदा ब्रिटीश शिकारीसाठी गेले असता त्यांनी वाघावर निशाना साधला. नेम हूकला. वाघ जखमी झाला. ब्रिटिशांसोबत काही गावकरी जंगलात गेले होते. जखमी वाघ परतून हल्ला करेल ही भीती ब्रिटिशांना होती. त्यांनी वामनपल्ली गावाला दक्ष राहण्याचा सूचना केल्या. तीन दिवसानंतर त्या जखमी वाघाची शिकार ब्रिटिशांनी केली. मात्र, तीन दिवस गाव भयभित होते. हा किस्सा उध्दव वेलादी यांनी सांगितला.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vamanpalli in Chandrapur was the favorite hunting ground of the British