अकोला जिल्ह्यात कडकडीत बंद

मनोज भिवगडे
Friday, 24 January 2020

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुधािरत नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नाेंदणीच्या (एनआरसी) विराेधात महाराष्ट्र बंदची घाेषणा केली. हा बंद यशस्वी हाेण्यासाठी भारिप-बमंस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पिंजून काढला.

अकोला : सुधािरत नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नाेंदणीच्या (एनआरसी) विराेधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार, 24 जानेवारी राेजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला विविध संघटननांनी प्रतिसाद दिला. अत्यावश्‍यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. दुपारपर्यंत कुठेहीअनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी शिक्षकांच्या गाड्या अडवण्याचे प्रकार झाले तर काही पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना त्यांचे प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यासाठी आग्रह केल्याचे दिसून आले.

 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुधािरत नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नाेंदणीच्या (एनआरसी) विराेधात महाराष्ट्र बंदची घाेषणा केली. हा बंद यशस्वी हाेण्यासाठी भारिप-बमंस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी आठवडाभर जिल्हा पिंजून काढला होता. प्रत्येक तालुक्यात बंदचे नियोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी शहरात फिरून सर्व व्यापारी संघटनांना व शाळा-महाविद्यालयांना  बंदला सहकार्य करून त्यांची प्रतिष्ठाणे व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शुक्रवार सकाळपासूनच अकोला शहरासह जिल्ह्यात बंदचा परिणाम दिसून आला. व्यापारी प्रतिष्ठाणे उघडण्यात आली नाही. वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमसंचे प्रदीप वानखडे आणि प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्‍वात जिल्ह्यात बंदचे नियोजन करण्यात आहे. बंद शांततेत राहील यासाठी प्रयत्न करण्यात आले. वंचितचे पदाधिकारी बाजारपेठेत फिरून प्रतिष्ठाणे बंद करण्याचे आवाहन करीत होते.

 

हेही वाचा ः वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

एसटीची वाहतूक सुरळीत
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी (ता.24) सीएला विरोध दर्शवित महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंद काळात अत्यावश्‍यक सेवा म्हणून एसटीला वगळ्यात आले. त्यामुळे एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यानंतरही एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवल्याचे दिसून आले. 

 

महत्त्वाचे ः बापरे! एवढी बेरोजगारी...

औषध दुकाने सुरू
अत्यावश्‍यक सेवा म्हणून औषध प्रतिष्ठाणे बंद मधून वगळ्यात आले होत. त्यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणी औषधांची दुकाने सुरू होती. दवाखाने आणि पॅथॉलिजीही सुरू होते. 

 

महत्त्वाचे ः सात-बाराची नोंद दाखवा, नंतरच तूर खरेदी

काही शाळांना सुटी
बंदमुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अकोला शहरातील काही शाळा मात्र त्यांच्या निर्धारित वेळेपर्यंत सुरू होत्या. यात हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट, बालशिवाजी शाळा, खंडेलवाल ज्ञानमंदिर आदी शाळा सुरू होत्या. 

एनसीआर सीएए एनपीआर व आर्थिक डबघाई विरोधात बंद म्हणजे कर्फ्यू नव्हे, आम्ही जनतेला कैद केले नाही. महाराष्ट्र बंद यशस्वी. हा मुद्दा जनते पर्यंत पोहचविण्याकरिता हा बंद आहे. हिंसाचार किंवा बळजबरी करणे हा आमचा हेतू नाही. तोडफोड होवू न देणे याला प्राथमिकता आहे. जनतेत हा इशू जाणे महत्त्वाचे. शांततापूर्ण बंद 100 टक्के यशस्वी.
- ॲड. बाळासाहेब आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchi Akola strike success