महाराष्ट्रात लोकसभेची तयारी सुरू; पहिला उमेदवार जाहीर

श्रीधर ढगे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

शेगाव : वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना लोकसभेची उमेदवारी शेगांव येथील वंचित माळी समजा राजकीय एल्गार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत ही घोषणा केली.

वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसची चर्चा सुरू असून, आघाडीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा करत बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे बाळापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे आमदार आहेत. आमदार बळीराम सिरस्कार हे माळी समाजाचे आहेत. माळीकार्ड सोबतच एमआयएम, भारिपची व्होट बँक ही वंचित आघाडीची जमेची बाजू असून, काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

Web Title: Vanchit Aghadi declared the first candidate of the Lok Sabha in Buldana