वनमंत्री मुनगंटीवार, अहीरांना फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

चंद्रपूर मतदारसंघात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरूवात झाली. सुरुवातीपासून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आघाडीवर होते. सातव्या फेरीपर्यंत किशोर जोरगेवार यांनी 17 हजार मतांनी समोर होते. जवळपास तीस ते चाळीस हजारांनी ते जिंकण्याची शक्‍यता आहे. सध्या दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे नाना श्‍यामकुळे यांना तीन हजार मते होते. कॉंग्रेसचे महेश मेंढे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

चंद्रपूर ः साडेचार वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदी झाली. त्यांचे परिणाम आता दिसू लागले आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही भाजपला त्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ एका जागी भाजप समोर आहे. राजुऱ्यात शेतकरी संघटना, तर अन्य ठिकाणी कॉंग्रेसने मुसंडी मारली आहेत. भाजपचा गड असलेल्या चंद्रपूर शहरातही अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या निकालाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एकटे पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चंद्रपूर मतदारसंघात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरूवात झाली. सुरुवातीपासून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आघाडीवर होते. सातव्या फेरीपर्यंत किशोर जोरगेवार यांनी 17 हजार मतांनी समोर होते. जवळपास तीस ते चाळीस हजारांनी ते जिंकण्याची शक्‍यता आहे. सध्या दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे नाना श्‍यामकुळे यांना तीन हजार मते होते. कॉंग्रेसचे महेश मेंढे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजप उमेदवार नाना श्‍यामकुळे यांच्याबद्दल असलेली नाराजी, दारूबंदीचा निर्णय याचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसनेही किशोर जोरगेवार यांना वेळेवर नाकारले होते. मात्र, मतदारांनी त्यांना स्वीकारले हे सध्याच्या निर्णयावरून दिसून येत आहे. बल्लारपूर मतदारसंघ हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा. पाचव्या फेरीपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांना 12 हजार 819 मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे डॉ. झाडे यांना 9 हजार 956, तर वंचितचे राजू झोडे 4 हजार 784 मते मिळाली होती. या मतदारसंघातून मुनगंटीवार किती आघाडी घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. राजुरा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे ऍड. वामनराव चटप चार हजार 771 मतांची आघाडी मिळाली. कॉंग्रेसचे सुभाष धोटे, विद्यमान आमदार ऍड. संजय धोटे यांच्याबद्दल मतदारांत प्रचंड नाराजी होती. कॉंग्रेसचे बंडखोर गोदरू पाटील यांचाही मोठा फटका कॉंग्रेसला बसला. ब्रह्मपुरी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत. पंधराव्या फेरीअखेर वडेट्टीवारांनी 13 हजार 957 मतांनी ते आघाडीवर होते. भाजप-सेनेचे संदीप गड्डमवार यांना 22 हजार 422 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर आपच्या ऍड. पारोमिता गोस्वामी आहे. त्यांना 1264 मते मिळाली. वरोऱ्यात भाजप-शिवसेनेचे संजय देवतळे सहाव्या फेरीत आघाडीवर ाहेते. त्यांनी एक हजार 70 मतांनी आघाडी घेतली. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आहेत. चिमूर मतदारसंघात सध्या काट्याची लढत सुरू आहे. येथे भाजपचे आमदार बंटी भांगडिया दोन हजार मतांनी पुढे आहे. सुरुवातीला कॉंग्रेसचे सतीश वारजूरकर समोर होते.
---------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanmantri mungantiwar ahirana fatka