esakal | Vardha: ४६७ शेतकऱ्यांचे २७८.९२ हेक्टरवर नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

वर्धा : ४६७ शेतकऱ्यांचे २७८.९२ हेक्टरवर नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : मार्च, एप्रिल व मे या महिन्यात झालेला अवेळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांचे २७८.९२ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत निधी प्राप्त झाला आहे. सदर मदतीचे तातडीने वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे मध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाली होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २७८.९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून पालकमंत्री सुनील केदार यांनी मदत निधीसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्वेक्षणाचे अहवाल शासनास पाठविण्यात आले होते.

नुकतेच मिळाले ३९ कोटी

शासनाकडून नुकतेच ३९ कोटी २४ लाख इतकी नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सदर रक्कम ४६७ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय बाधित शेतकरी व मदत वाटपाचा आढावा घेऊन तातडीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

झालेले नुकसान

तालुका पीक (हेक्टर)

आर्वी २५२.०७

वर्धा १४.४०

सेलू ७.३०

देवळी ३.२५

कांरजा २.००

loading image
go to top