वर्धा - आर्वी येथे आढळला पांढरा साप

राजेश सोळंकी
सोमवार, 19 मार्च 2018

आर्वी (वर्धा) : येथील पिपला पुनर्वसन येथे दुर्मिळ प्रजातीचा पांढरा साप आढळल्यामुळे नागरिक अचंबित झाले व खळबळही उडाली. या पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हा दूर्मिळ साप राहुल ठाकरे (रा पिंपला पुनर्वसन) यांच्या घराच्या परिसरात आढळला. 

पांढरा नाग हा साप, नाग जातीचा आहे व तो विषारी व आतिशय  वेगळा आहे, या आधी असा नाग एकदा चंद्रपूर इथे सापडला होता. त्या  नंतर त्याची नोंद आर्वी शहरात झाली. आर्वी येथील पीपला पुनर्वसन येथील रहिवसी राहुल ठाकरे यांच्या कडे हा साप आढळला.  त्यांनी प्राणिमित्रांना याबाबत माहिती दिली व त्वरित घटनास्थळी येऊन प्राणीमित्रांनी या सापाला शिताफीने पकडले.

या नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. वन विभागाचे कर्मचारी कावले, सावंत, कुकडे आणि प्राणीमित्र तुषार साबळे शुभम जगताप, आकाश ठाकरे, रितेश कटेल, मोनू मुला, संकेत वनस्कर, सूरज विरपचे व गीते यांनी या सापाला सागरपुरी तलावात सोडले. हा दुर्लभ लिमुसिसटिक साप असुन विषारी आहे कारण एलबिनो जनावरांचे डोळे गुलाबी असतात असे प्राणीमित्र शुभम जगताप यांनी  सांगितले.
 
Web Title: vardha found white snake in arvi