वारी लालपरीची

नागपूर : एसटीच्या वाटचालीची माहिती नोंदवताना विद्यार्थी.
नागपूर : एसटीच्या वाटचालीची माहिती नोंदवताना विद्यार्थी.

नागपूर : खेड्यांना जोडणाऱ्या लालपरीची राज्याच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. 71 वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या एसटीची देदीप्यमान वाटचाल प्रदर्शन स्वरूपात मांडण्यात आली आहे. बसमध्येच उभारलेले हे फिरते प्रदर्शन मंगळवारी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर अवलोकनासाठी उपलब्ध होते. ही "वारी लालपरीची' नागपूरकरांना चांगलीच भावली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व बस फॉर अस फाउंडेशनच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नागपुरात या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण अंधारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य परिवहन नियंत्रण समिती क्र. तीनचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप याच्यासह एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
1948 मध्ये अहमदनगर ते पुण्यापर्यंत पहिली एसटी धावली. त्यावेळी बेडाफोर्ड कंपनीच्या बसचा उपयोग केला होता. महामंडळाचे पहिले चालक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते एक जून रोजी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. एसटीच्या 71 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक टप्पे असून, वर्षनिहाय माहिती प्रदर्शनात मांडली आहे. याशिवाय प्रवासी आणि एसटी कामगारांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती उपलब्ध आहे.
महामंडळाने सामाजिक बांधीलकीतूनही अनेक उपक्रम राबविले आहेत. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास, दुष्काळी भागातील युवकांची मेगा भरती, दुष्काळाने तहानलेल्या गावांना आधार, मानव विकास योजना, वीरपत्नीला मोफत प्रवास आणि वारसांना पात्रतेनुसार नोकरी, अपघाताप्रसंगी 10 लाखांचा विमा आदींबाबत सविस्तर माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. महाल येथील नवयुग विद्यालयासह अन्य शाळांतील विद्यार्थी आणि दीड ते दोन हजार प्रवासी व नागपूरकरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com