वरुण गांधी उद्या नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर - भाजपचे खासदार वरुण गांधी येत्या 21 एप्रिलला नागपुरात येत असून, ते युवकांशी संवाद साधणार आहेत. भाजपच्या असंतुष्ट नेत्यांमध्ये समावेश असलेले वरुण गांधी नागपुरात काय बोलणार? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या संघटनांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. काही दलित संघटना व तिरपुडे महाविद्यालयाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. तरुणांचे प्रश्‍न व त्यांच्याशी संवाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. भाजपचे आमदार आशिष देशमुख हे वरुण गांधी यांच्या विश्‍वासातील मानले जातात आणि ते पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर वरुण गांधी यांचे नागपुरातील आगमन व त्यांचे भाषण उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
Web Title: varun gandhi in nagpur