esakal | बापरे, फक्त एका भवनावर ९० लाखांचा खर्च; उधळपट्टी येणार समोर?
sakal

बोलून बातमी शोधा

vasant bhawan expenditure point will be present in zp meeting of chandrapur

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यात यंदाचे बजेटही 60 कोटीवरून तीस कोटीवर आले. जिल्हा परिषदेकडे उत्पन्नाचे स्रोत फार नाही. शहरातील एकमेव वसंत भवन आहे.

बापरे, फक्त एका भवनावर ९० लाखांचा खर्च; उधळपट्टी येणार समोर?

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : जिल्हा परिषद मालकीच्या असलेल्या वसंत भवनावर गेल्या पाच वर्षांत तब्बल 90 लाखांचा खर्च करण्यात आला. हा खर्च खरोखर झाला की नाही याबाबत काही जिल्हा परिषद सदस्यांना शंका आहे. त्यामुळे त्यांनी मागील स्थायी समितीत वसंत भवनाची संपूर्ण माहिती मागिवली. येत्या मंगळवारी (ता. 8) स्थायी समितीची सभा होत आहे. या सभेत वसंत भवनावरील उधळपट्टी समोर येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

हेही वाचा - 'सुपर स्पेशालिटी'वर अर्धी 'सर्जरी', रिक्तपदांच्या निर्मितीला मान्यता; 465...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यात यंदाचे बजेटही 60 कोटीवरून तीस कोटीवर आले. जिल्हा परिषदेकडे उत्पन्नाचे स्रोत फार नाही. शहरातील एकमेव वसंत भवन आहे. मात्र, या भवनाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ तीस लाख उत्पन्न देणाऱ्या वसंत भवनावर 90 लाखांचा खर्च करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वसंत भवनावरील गाळ्यातील भाडेवाढीचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी उचलून धरला होता. मागील महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही त्याचे पडसाद उमटले.

हेही वाचा - विजय वडेट्टीवार यांच ‘एक तीर दो निशान’; उदयनराजेंच्या निमित्ताने फडणवीसांना हाणला टोला

वसंत भवनातील गाळेधारकांचे करार 2018 मध्ये संपुष्टात आले. त्यानंतर भाववाढ अपेक्षित होती. त्याला गाळेधारकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे गाळेधारक अनधिकृत राहत आहे. शासकीय नियमानुसार त्यांच्याकडून 40 टक्क्यांपर्यंत भाववाढ करण्याचा विचार समितीच्या सदस्यांचा आहे. मात्र, भाववाढ गाळेधारकांना मान्य नाही. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेने नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पाच वर्षांत वसंत भवनाच्या डागडुजीवर तब्बल 90 लाख रुपये खर्च करण्यात आले. उत्पन्न कमी असताना त्यावर झालेला खर्च बघता जिल्हा परिषद सदस्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. त्यामुळे 90 लाखांचा खर्च कुठे-कुठे झाला याची माहिती मागील सभेत मागविण्यात आली होती. 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत ही माहिती सादर करण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top