सहायक वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी आरटीओ कार्यालयात सापळा रचून लाचेची मागणी करणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक आणि एका दलालाच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांनी दुचाकीचे लर्नींग लायसन्स तत्काळ मिळवून देण्यासाठी दोन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारताला दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले. 

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी आरटीओ कार्यालयात सापळा रचून लाचेची मागणी करणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक आणि एका दलालाच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांनी दुचाकीचे लर्नींग लायसन्स तत्काळ मिळवून देण्यासाठी दोन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारताला दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले. 

मिथून डोंगरे (38) असे मोटर वाहन निरीक्षकाचे तर मुकेश रामटेके (36) असे दलालाचे नाव सांगण्यात येते. याप्रकरणातील तक्रारकर्ते झिंगाबाई टाकळी येथील रहीवासी आहेत. त्यांनी शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकी चालविण्यासाठी लागणारा परवाना काढण्यासाठी अर्ज केला होता. लायसन्स लवकर मिळावे यासाठी तक्रारकर्ते सहायक मोटर वाहन निरीक्षक मिथून डोंगरे याच्यासह आरटीओ कार्यालयात दलाली करणाऱ्या मुकेयला भेटले. दोघांनीही लायसन्स काढून देण्याची तयारी दाखवत दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. पण, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी आरटीओ कार्यालयात सापळा रचण्यात आला. मिथून याच्यासोबत बोलणी केली असता त्याने मुकेशकडेच पैसे सोपविण्यास सांगितले. तक्रारदाराकडून मुकेशनेच 2 हजार रुपये स्वीकारले. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून प्रारंभी मुकेशच्या व नंतर मिथूनला ताब्यात घेतले. याप्रकरणी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांमध्ये दिवसभर भितीचे वातावरण होते तर परिसरातील दलाल अचानक बेपत्ता झाल्याचे दिसून आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अचानक फारच सक्रीय झाला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी सापळा रचून दोन खाजगी व्यक्तींना ताब्यात घेतले. सोमवारी नागपुरात सापळा रचून गडचिरोलीच्या तहसिल कार्यालयातील लिपिकाच्या मुसक्‍या आवळल्या. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सापळा रचून सहायक वाहन निरीक्षक व दलाला ताब्यात घेण्यात आले. 

Web Title: vehicle inspector is in the trap of ACB