कार्यवाहीसाठी चिमुकल्यांसह वाहन लावले ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कॉन्व्हेंटची सुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाला सोडण्यास निघालेल्या वाहनावर कार्यवाही करण्यासाठी वाहतूक शिपायाने चिमुकल्यांसह वाहन ठाण्यात लावले. चालकाची चौकशी होईपर्यंत विद्यार्थ्यांना तासभर ताटकळत राहावे लागले. हा संतापजनक प्रकार बुधवारी (ता. 7) गोंडपिपरी येथे घडला.

धाबा येथील दहा ते बारा विद्यार्थी गोंडपिपरी येथील संजो कॉन्व्हेंट येथे प्राथमिक शिक्षण घेत आहेत. धाबा येथील मुरमुरवार यांच्या मॅजिक वाहनाने ते ये-जा करतात. आज दुपारी 2.30 वाजता कॉन्व्हेंटची सुटी झाल्यावर विद्यार्थी गावाकडे जाण्यासाठी वाहनात बसले. यावेळी वाहतूक शिपाई कॉन्व्हेंटसमोर पोहोचले. त्यांनी चालकाला दमदाटी करीत वाहन ठाण्यात लावण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांसह वाहन ठाण्यात लावण्यात आले.
पोलिस ठाण्याच्या आत चालक, तर बाहेर वाहनात विद्यार्थी ताटकळत होते. वाहतूक पोलिस मात्र असंवेदनशीलतेचा परिचय देत होते. संदीप ढोबे गोंडपिपरीचे ठाणेदार आहेत. गेल्या महिनाभारापूर्वीच ते रुजू झालेत. अल्पकाळात त्यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत विविध सामाजिक हिताचे उपक्रम राबविले. दारुबंदीला आळा घातला. गरजूंना मदतीचा हात दिला. अशावेळी ठाणेदारांना माहिती न देता परस्पर चिमुकल्यांसह वाहन ठाण्यात लावण्याचा वाहतूक शिपायाने केलेला प्रताप संतापजनक आहे. संजो कॉन्व्हेंटजवळ वाहतुकीची मोठी कोंडी होते. ती समस्या मार्गी न काढणाऱ्या वाहतूक विभागाकडून असला प्रकार करण्यात आल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles were installed at the police station with school children