esakal | Amravati: रिक्त पदांत अडकला महसूलचा कारभार; कामे रेंगाळली
sakal

बोलून बातमी शोधा

 पदे रिक्त

अमरावती : रिक्त पदांत अडकला महसूलचा कारभार; कामे रेंगाळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती) : एकीकडे राज्य शासनाने तहसील कार्यालयाची प्रशस्त इमारत तयार करून दिली. मात्र या तालुक्याचा कार्यभार सांभाळायला लागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २५ पदे रिक्त असल्याने महसुलाचा कारभार रिक्त पदांच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसून येते.

तालुक्यातील महसुली यंत्रणा गतिमान व पारदर्शक होण्यासाठी कार्यरत असलेल्या तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार, दोन मंडळ अधिकारी, पाच कनिष्ठ लिपीक, चार तलाठी, तर १२ कोतवाल, अशी एकूण तब्बल २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: सर्व क्रीडा स्पर्धांनाही परवानगी द्यावी : स्पोर्टस् असोसिएशन

शासनाच्या अनेक निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे २०१८ पासून प्रलंबित आहेत. तसेच इतर विभागाच्या कामकाजावरही कमी मनुष्यबळाचा परिणाम झाला आहे. याबाबत अनेक पक्ष व संघटनांनी निवेदने देऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली. मात्र अपूर्ण मनुष्यबळामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कर्मचारी गैरहजर, काही प्रतिनियुक्तीवर

वरुड तहसील कार्यालयात सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहतच नाहीत. एक कनिष्ठ लिपिक प्रबोधिनी येथे प्रतिनियुक्तीवर आहे. काही कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून विनापरवानगीने गैरहजर असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे काही कर्मचारी या कार्यालयातून पगार घेऊनही कर्तव्यावर दिसून येत नसल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह दिसून येते.

वरुड तालुक्याचा कार्यभार सुरळीत चालविण्याकरिता रिक्त पदे भरण्याची गरज आहे. मी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याबरोबरच येथील दलालांचा गैरप्रकार लवकरच बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे.

- गजेंद्र मालठाणे, तहसीलदार, वरूड

loading image
go to top