esakal | प्राणघातक हल्लेखोर अखेर जेरबंद, 24 तासात लागला प्रकरणाचा छडा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

प्राणघातक हल्लेखोर अखेर जेरबंद, 24 तासात लागला प्रकरणाचा छडा

sakal_logo
By
आनंद सुरोशे

मुळावा : पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुळावा येथील हॉटेल गुरुदत्त चे मालक श्याम मोहन शामसुंदर यांनी हॉटेलच्या उधारीची मागणी केल्याने त्यांच्यावर चार युवकांनी रॉड व लाकडी काठीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जबर जखमी केले होते. या घटनेतील एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आला होता.

उर्वरित तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे तीन आरोपी नामे शिवाजी साहेबराव कुऱ्हाडे (वय 19) सतीश देविदास चव्हाण ( वय 19 ) महेश कैलास गोरे (वय20 ) यांना मोठ्या शिताफीने 24 तासाच्या आत अटक केली पोलीस स्टेशनच्या दोन टीम स्थानिक गोपनीय माहितीच्या आधारे एक टीम नांदेड व दुसरी टीम परभणी रवाना करण्यात आली होती.

हेही वाचा: लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत

अखेर मोबाईल लोकेशन आधारे जालना पासून 7 किलोमीटर गाडीच्या शोधात हे तिघे फिरत असताना यांना अचानक पाठलाग करून दि11,9,2021 रोजी सकाळी 10,30 वाजता ताब्यात घेण्यात आले व आज दि 12/09 2021 उमरखेड न्यायालय येथे हजर करण्यात आले व कोर्टाने त्या तीनही आरोपींचे चार दिवसाचा पीसीआर मंजूर केला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजीव हाके नाना मस्के न.पो.का. रुपेश पाली. अमोल कानेकर, परशुराम ईगोले व राम गडदे यांनी ही कारवाई केली व पुढील तपास पोफळी पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस उपनिरक्षक राजेश पंडित पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.

उपविभागीय अधिकारी अनुराग जैन यांच्या योग्य मार्गदर्शन आणि सल्ल्यामुळे आरोपीस 24 तासांच्या आत ताब्यात घेण्यास यश मिळाले'

- ठाणेदार, राजीव हाके

"समाजामध्ये बालगुन्हेगारी वाढविण्यास व्यसनाधीनता कारणीभुत असुन याचा परीणाम पुढील तरूण पीढीवर पडत आहे.

- उपविभागीय अधिकारी, अनुराग जैन

loading image
go to top