टेकाडी : शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्चातून रोगराईला आळा घालण्यासाठी हागणदारीमुक्त गाव योजना शासनाने राबविली होती. मात्र, आजही तालुक्यातील गावे हागणदारी मुक्त झाली असे म्हणता येणार नाही. त्याला अपवाद म्हणजे ग्रामपंचायत टेकाडी (को.ख.) स्थानीय प्रशासन गाव हागणदारीमुक्त कागदोपत्री म्हणत जरी असेल तरी गावांमधील बरेच नागरिक आजही हातात टमरेल घेऊन जाताना दिसून पडतात. त्यामुळे स्वच्छ वातावरणात शतपावली करायला जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांना अनुदान दिले. लाभार्थ्यांनी शौचालय देखील उभारले. मात्र काहींचा शौचालयात शौचास जाण्यास मज्जाव असल्याने टेकाडी ग्रामपंचायत अंतर्गत महाजन नगरचा ‘रामसरोवर’कडे जाणाऱ्या मार्गावर सध्या टमरेल घेऊन शौचास जाणारे नागरिक मोठया प्रमाणात दिसून येत आहेत. गावच्या मुख्य रस्त्याची चाळण झाल्याने सध्या शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या रस्त्यावर गोंडेगाव, वेकोली कर्मचाऱ्यांसह वाहतुकीची वर्दळ याच मार्गावर असते.
सोबत आरोग्य सुदृढ रहावे, याकरिता नागरिक याच रस्त्यावरून सकाळी शतपावलीकरिता जातात. त्यांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गाव हागणदारीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. हागणदारीसोबत याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेणखत सोबत घरेलू टाकाऊ भाजीपाला आणि इतर वस्तूदेखील याच रस्त्यावर टाकल्या जात असल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि घाणीचे साम्राज्य पसरले जात आहे.
विकासकामांना खीळ
चार वर्षांच्या कार्यकाळात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कुचकामी राजकारणाने गावातील विकासकामांना खीळ बसवली. ना जनहितार्थ जनजागृती, ना नवीन संकल्पना मात्र, स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छतेवर लाखो रुपय खर्च केले जातात. नागरिकांकडून स्वच्छता कर देखील आकारला जातो. मात्र स्वच्छता जर फक्त कागदोपत्रीच असेल तर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार कोण, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.