esakal | राज्यातील मंदिरे उघडली, पण विदर्भातील रुख्मिनी मातेचं मंदिर बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

Rukhmini Temple, Amravati

राज्यातील मंदिरे उघडली, पण विदर्भातील रुख्मिनी मातेचं मंदिर बंदच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : राज्य सरकारने केलेल्या घोषणेनंतर राज्यातील मंदिरं आजपासून (maharashtra temple opening) सुरू करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी आजपासून मंदिर उघडण्यासंदर्भात नियम, अटीनुसार मंदिर उघडण्यासंदर्भात पत्रक काढलं आहे. मात्र, विदर्भातील सर्वात महत्वाचं समजलं जाणारं कौडण्यपूर येथील रुख्मिनी मातेचं मंदिर (Rukhmini temple amravati ) अद्याप बंदच आहे.

हेही वाचा: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे राज्यातील मंदिरं बंद होती. मंदिरे उघडण्याची मागणी वारंवार कऱण्यात येत होती. त्यानंतर आजपासून नवरात्रीनिमित्त राज्यभरातील मंदिरं सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी भाविकांनी पहिल्याच दिवशी देवाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

राज्यातील मंदिर उघडले असताना नेमकं रुख्मिनी मातेचं मंदिर बंद असल्यामुळे भाविकांचा हिरमोड होत असल्याच्या प्रतिक्रिया येणाऱ्या भाविकांनी यावेळी दिल्या. आरोग्याच्या दुष्टिकोनातून कौडण्यपूर मंदिर संस्थाचे वतीने विविध नियमाअंतर्गत दर्शनाची व्यवस्था करून उघडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस भक्तांना रुक्मिणीच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्याना राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यात १० पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी होय. कौडण्यपूरचं रुक्मिणी मातेचं मंदिर बंद असल्याने लांब वरून येणाऱ्या भाविकांना आल्या पावली परत जावे लागत आहे..

loading image
go to top