बुलढाणा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत न मिळाल्यामुळे मी आमदारांचे घर जाळून टाकतो, असे म्हणत शेतकरी पेट्रोलची कॅन घेवून माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे यांच्या जळगाव जामोद येथील घराच्या आवारात शिरल्याची घटना ता.१३ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.