Vidarbha Heatwave
esakal
श्रीकांत राऊत
अकोला, ता.२७ : विदर्भात उष्णतेची लाट कायम असून आजही बहुतांश जिल्ह्यांत तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. अमरावतीत ४६.६ अंश तापमानासह सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली. वर्धा ४६.५ तर अकोला येथे ४६.३ अंश तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता.२६) अकोला सर्वाधिक उष्ण होते.