Vidarbha Heatwave Alert Till Friday
esakal
यवतमाळ : वाढत्या तापमानामुळे जिल्हा अक्षरशः होरपळत असून पुढील काही दिवस नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागणार आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी जिल्ह्यात 22 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्तींना विशेष धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.