

bailgada sharyat
धामणगावरेल्वे (जि. अमरावती), ता. २८ ः तालुक्यातील जळका पटाचे येथील विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी सोमवारपासून (ता.२९) गाजणार असून १११ वर्षांनंतर येथे पुन्हा विदर्भातील पहिला मानाचा पट सुरू होणार आहे. या पटात विदर्भासह विविध राज्यांतील बैलजोड्या दाखल झाल्या आहेत.