कोण पळवतोय विदर्भातील पाणी? कुणाचे षडयंत्र...वाचा

dam
dam

अमरावती : मेळघाटातील तापी नदीवर प्रस्तावित मेघा रिचार्ज परियोजनेस तापी पंचायतने तीव्र विरोध दर्शविला आहे. ही परियोजना या भागातील आदिवासी समाज व त्यांचे क्षेत्र बुडवणारी असल्याचा पंचायतचा आक्षेप असून विदर्भातील पाणी बाहेर पळविण्याचे षड्‌यंत्र असल्याचा आरोप करून पंचायतने ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

तापी नदीवर खारिया घुटीघाट बांध बांधण्याचा अठरा वर्षांपूर्वी केलेला प्रयत्न तापी पंचायतने हाणून पाडला होता. त्यासाठी आदिवासी समाजाला सोबत घेऊन पंचायतने सात वर्षे लढा दिला. त्यावेळी पंचायतने तापी नदीच्या जलग्रहण क्षेत्राचे विकेंद्रीकरण व गावकेंद्रित जलनियोजन करण्याची योजना दिली होती. ज्यामुळे क्षेत्र वाचण्यासोबतच व जंगल तोड न करता स्थानिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. यासोबतच त्यांच्या हिश्‍श्‍याचे पाणी दुसऱ्या प्रदेशात वळविण्यावरही अंकुश येईल. मात्र तापी पंचायतने दिलेल्या या प्रस्तावाचा विचार करण्यात आला नाही व पुन्हा मेघा रिचार्जसारखे प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.


तापी मेगा रिचार्ज रद्द करण्याची तापी पंचायतची मागणी
तापी मेगा परियोजनेसाठी 5,428 कोटी रुपये अंदाजित खर्च असून 3325 हेक्‍टर भूमी अधिग्रहित करावी लागणार आहे. यामध्ये 1397 हेक्‍टर जमीन वनक्षेत्राची आहे. आशिया खंडातील ही पहिली परियोजना असून पाणी रोखून पावसाळ्यात 232 व 150 किलोमीटर कालव्यातून ते फिरवून लाभक्षेत्रातील नदी, नाले व विहिरींची जलपातळी वाढविण्यासोबतच 3 लाख 50 हजार हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, अशी महामंडळाची माहिती आहे.

तापी मेगा रिचार्ज परियोजना मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यात झालेल्या पाणीवाटपाच्या आंतरराज्यीय करारचे उल्लंघन आहे, असा तापी पंचायतचा आरोप असून विदर्भातील पाणी बाहेर नेण्याचा डाव असल्याचे मत आहे. ज्या भागात सिंचनासाठी हे पाणी नेण्यात येणार आहे, तेथील अधिकांश जमीन आधीच सिंचनाखाली आहे. त्यामुळे हे पाणी सिंचनाच्या नावाखाली उद्योग व वीज योजनांना देण्याचे षड्‌यंत्र असल्याचाही त्यांचा आरोप आहे.


मेळघाटातील आदिवासी समाजाचे या परियोजनेमुळे नुकसान होणार असून ते रोखण्याकरिता हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी तापी पंचायतचे विवेकानंद माथने, रामप्रसाद कवडे, द्वारकाभाई बरमैया, रामसिंग सलामे, धनसिंग कुमरे, भैयालाल इवने, अनिल उईके व सुकलू मस्कॉले यांनी केली असून, मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी वेळ मागितला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com