

Vidarbha Leopard Attacks
sakal
मौदा/कन्हान : विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु असताना विदर्भातील अनेक भागांत बिबट्या व वाघांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सभागृहात जोरदारपणे पुढे येत असून वन्यप्राणी नियंत्रण, रेस्क्यू, नुकसानभरपाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.