पोलीस स्टेशन समोर मद्यपी चक्क कपडे काढून झाला नग्न  

देवानंद गहिले
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

एक मोटर चालक चान्नी येथे बस स्थानकावर उतरला आणि दारू प्यायला. दारु त्याच्या अंगात आल्यानंतर त्याने चौकात जोरदार धिंगाणा घातला आणि नागरिकांच्या नाकी नऊ आणले. शिविगाळ करित तो स्वतःचे सर्व कपडे काढून चक्क नग्न झाला.  त्याने अशा पद्धतीने तब्बल अर्धा तास गोंधळ घातल्या नंतर तेथे चान्नी पोलीस आले

पातूर - पातूर तालूक्यातील चान्नी येथे अवैध दारू विक्री चा महापूर आहे. याचा परिणाम नागरीकानी नुकताच अनुभवला .

एक मोटर चालक चान्नी येथे बस स्थानकावर उतरला आणि दारू प्यायला. दारु त्याच्या अंगात आल्यानंतर त्याने चौकात जोरदार धिंगाणा घातला आणि नागरिकांच्या नाकी नऊ आणले. शिविगाळ करित तो स्वतःचे सर्व कपडे काढून चक्क नग्न झाला. 
त्याने अशा पद्धतीने तब्बल अर्धा तास गोंधळ घातल्या नंतर तेथे चान्नी पोलीस आले आणि त्यानी चान्नी पो.स्टे.चा सीसीटीव्ही वाचवत आत नेले आणि त्याला कपडे घालुन दिले .

गावात दारुचा महापुर असल्याने ग्रामस्थाना हा त्रास नेहमी सहन करावा लागत असल्याने गावातील दारू विक्री बंद करावी अशी मागणी आहे. 

Web Title: vidarbha news: drunkard