शहरात तिसऱ्याही दिवशी दमदार सरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नागपूर - विदर्भात पावसाचा जोर कायम असून, नागपुरात लागोपाठ तिसऱ्या दिवशी दमदार सरी बरसल्या. मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र पाऊस पडतो आहे. रविवार व सोमवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आजही दुपारी दीडच्या सुमारास मेडिकल चौक, सक्‍करदरा, नंदनवन, मानेवाडा, लक्ष्मीनगर, दिघोरी, स्वावलंबीनगर, रेशीमबाग, सोमलवाडा, प्रसादनगर, जयताळा, त्रिमूर्तीनगर, सदर, झिंगाबाई टाकळी, कोराडी, महादुला, वाडी, बुटीबोरी, बेला रोड या भागांत जोरदार पाऊस झाला. हवामान विभागातर्फे सायंकाळी साडेपाचपर्यंत 14.6 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

नागपूर - विदर्भात पावसाचा जोर कायम असून, नागपुरात लागोपाठ तिसऱ्या दिवशी दमदार सरी बरसल्या. मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र पाऊस पडतो आहे. रविवार व सोमवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आजही दुपारी दीडच्या सुमारास मेडिकल चौक, सक्‍करदरा, नंदनवन, मानेवाडा, लक्ष्मीनगर, दिघोरी, स्वावलंबीनगर, रेशीमबाग, सोमलवाडा, प्रसादनगर, जयताळा, त्रिमूर्तीनगर, सदर, झिंगाबाई टाकळी, कोराडी, महादुला, वाडी, बुटीबोरी, बेला रोड या भागांत जोरदार पाऊस झाला. हवामान विभागातर्फे सायंकाळी साडेपाचपर्यंत 14.6 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात ब्रह्मपुरी (58.6 मिलिमीटर) आणि वाशीम (24.8 मिलिमीटर) येथेही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळत चालल्याने पावसाचा जोर आता हळूहळू कमी होणार आहे.

Web Title: Vidarbha rain