Vidarbha Rain News : पिंप्री येथील १२० नागरिक अडकले पाण्यात; एनडीआरफच्‍या टीमने सुखरूप काढले बाहेर

संग्रामपूरचा शेगाव, जळगाव जामोद या तालुक्‍यांशी संपर्क तुटला
vidarbha rain update pimpri 120 people stuck ndrf rescue safely monsoon weather sangrampur
vidarbha rain update pimpri 120 people stuck ndrf rescue safely monsoon weather sangrampursakal

Sangrampur Rain News : संग्रामपूर तालुक्‍यात काल (ता.२१) सायंकाळपासून सुरु झालेला अद्यापही थांबलेला नसूर, यामुळे संग्रामपूरचा शेगाव, जळगाव जामोद या तालुक्‍यांशी संपर्क तुटला आहे. तसेच तालुक्‍यातील वान, लेंडी,

आलेवाडी, पांडव, केदार, पूर्णा या नद्यांना पूर आले असून, लाडणापूर, बानवबीर, सोनाळा, वरवट बकाल, वडगाव, वानखेड तसेच संग्रामपूर शहरात देखील पुराचे पाणी शिरले आहे. या नद्यांना आलेल्‍या पुराला उपरोक्‍त सर्व गावांमधील घरांमध्ये शिरत असल्‍याने असल्‍याने अनेकांनी सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर केले आहे. तसेच काथरागाव.

vidarbha rain update pimpri 120 people stuck ndrf rescue safely monsoon weather sangrampur
IMD Alert : गोंदिया जिल्ह्यात पुढील आठवडाभरात जोरदार पाऊस हवामान खात्याचे संकेत

पिंप्री येथील १२० नागरिक पाण्यात अडकले होते. येथील पांडव व लेंडी नदीमुळे या गावाला पावसाळ्यात पुराचा वेढा बसतो. या नागरिकांना एनडीआरफ च्‍या टीमने बचाव कार्य करीत सुखरूप बाहेर काढले. या सर्व परिस्‍थितीवर आमदार डॉ.संजय कुटे, एसडीओ शैलेश काळे,तहसीलदार योगेश टोंपे लक्ष ठेवून आहेत.

vidarbha rain update pimpri 120 people stuck ndrf rescue safely monsoon weather sangrampur
Vidarbha Rain Video : विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; घरे पाण्याखाली, पिकांचे नुकसान

जळगाव जामोद तालुक्‍यालाही फटका

कालपासून सुरु असलेल्‍या पावसामुळे संग्रामपूरसह जळगाव (जामोद) उपविभाग देखील जलमय झाला असून जळगाव जामोद शहरात देखील सर्वत्र पाणीच पाणी आहे. तसेच तालुक्‍यातील नदीकाठच्या वस्‍त्‍यामध्ये घराघरात पाणी शिरले असून, हजारो हेक्टर जमीन खरडून गेली.

तसेच स्थावर मालमत्तेचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील धानोरा, खेरडा, मडाखेड, सूनगाव, आसलगाव, जामोद, पळसखेड, मळाखेड ,इलोरा,चावरा या गावांचा या पुराचा मोठा फटका बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com