नोटाबंदीवरून विधान परिषद दोनदा तहकूब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नागपूर - केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि राज्यातील बारा नागरिक बॅंकेच्या रांगेत मृत्युमुखी पडले. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि कॉंग्रेसचे नारायण राणे यांनी विधान परिषदेत मांडला. सत्तारूढ पक्षाची चर्चेची तयारी आहे. प्रश्‍नोत्तराचा तास होऊ द्यावा, अशी विनंती सत्ताधारी पक्षातर्फे चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र, विरोधक आक्रमक झाले आणि सभापतींच्या समोरील जागेत येऊन गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा स्थगित करावे लागले.

धनंजय मुंडे यांनी नोटाबंदीवर स्थगन प्रस्ताव ठेवला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत नव्याने निवडून आलेल्या सहा सदस्यांची ओळख करून दिली. त्यानंतर कॉंग्रेसचे नारायण राणे यांनी नोटाबंदीवर बोलण्यास सुरवात केली. या वेळी नव्याने सभागृहात आलेले शिवसेनेचे सदस्य तानाजी सावंत उभे न होता बोलू लागले. राणे यांनी नियम समजून बोला, असा सल्ला दिला. सभापतींनीही बसून बोलू नका, अशी समज दिली. स्थगन प्रस्तावावर प्रवीण दरेकर बोलण्यास उभे राहिल्यानंतर सत्ताधारी पक्षातील सदस्यांना बोलता येत नसल्याचा मुद्दा सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्‍नोत्तराचा तास घेण्याची विनंती केली. त्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे सभापतींनी विरोधकांना बसण्याच्या सूचना केली. मात्र, गोंधळ वाढल्याने त्यांनी 25 मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले.

सभागृह सुरू झाल्यानंतर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना बोलण्याची परवानगी दिल्यामुळे विरोधक अधिकच संतप्त झाले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली आणि सभापतींसमोरील जागेत आले. विरोधकांनी प्रथम नोटाबंदीच्या स्थगन प्रस्तावावर निर्णय घ्या, अशी मागणी केली. उपसभापतींनी दालनात बैठक घेऊन यावर निर्णय घेऊ, असे म्हणताच नारायण राणे यांनीही प्रथेनुसार सभागृह चालवावे, अशी सूचना केली. विरोधकांचा गोंधळ वाढल्याने 45 मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आले. कांद्याचे भाव कोसळल्याने सदस्य जयंत भोसले आणि हेमंत टकले यांनी काद्यांची माळ गळ्यात घालून सरकारचे लक्ष वेधले.

Web Title: vidhan parishad stop by currency ban