Vidhan sabha 2019 : अमित शहा यांची खापरखेडा येथे सभा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची सावनेर मतदारसंघातील खापरखेडा येथे शुक्रवारी (ता. 11) विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्यात शहा यांच्या मोजक्‍याच सभा असून त्यातील एक सभा खापरखेडा येथे होणार आहे. जिल्ह्यातील शहा यांची ही एकमेव सभा असल्याचे बोलले जात आहे. 

खापरखेडा येथील अन्ना मोड मैदानावर शुक्रवारी दुपारी चार वाजता शहा कार्यकर्त्यांना संबोधित करतील. सावनेर मतदारसंघात कॉंग्रेसचे दबंग नेते सुनील केदार यांच्या विरुद्ध भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ही लढत हायप्रोफाईल मानली जात आहे. यातच शाह यांची सभा लागल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सभेला जिल्ह्यातील सर्व बारा मतदारसंघातील भाजपचे उमेदवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह राज्यातील भाजपचे सर्व मोठे नेते व संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे भाजपकडून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan sabha 2019 Amit Shah's meeting in Khaparkheda