वेमुलाची आई उत्तर प्रदेशच्या प्रचारात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

नागपूर - आपल्‍या मुलाला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या दोषींना शिक्षा देण्यास केंद्र  सरकार अपयशी ठरल्याने रोहित वेमुला यांच्या आई राधिका यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपविरुद्ध प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बसपत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. मात्र, राधिका वेमुला यांनी आपण अद्याप कुठल्याच पक्षात प्रवेश घेतला नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दीक्षाभूमीवरील  धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी राधिका वेमुला नागपूरला आल्या होत्या. बुधवारी त्यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. 

या वेळी वेमुल्ला परिवार राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. भाजपच्या जातीय राजकारणामुळे रोहितने आत्महत्या केली. या घटनेला नऊ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे येत्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये वेमुल्ला परिवार सक्रिय सहभाग घेणार असून भाजपच्या विरोधात प्रचार करणार आहे. या वेळी बसपचे प्रदेश सचिव सागर डबरासे, जितेंद्र घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते.

रुपनवाला अहवाल भाजपलिखित
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची चौकशी न्यायमूर्ती अशोक कुमार रुपनवाला यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी समितीचा अहवाल दिला. यावर आक्षेप व्यक्त करत राधिका वेमुला यांनी समितीचा अहवाल आपल्याला मान्य नसल्याचे सांगितले. तो समितीचा अहवाल नसून भाजपलिखित अहवाल असल्याचा आरोप त्यांनी लावला. या वेळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: vidhansabha election publicity by radhika vemula