Vidharbha : आधी नुकसान निरंक; आता बाधितांसाठी ७६.३८ कोटींची मागणी

जिल्हा प्रशासनाचा विभागीयस्तरावर अंतिम अहवाल
Vidharbha
Vidharbhaesakal

मंगरूळपीर : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या अखेरीस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. प्रशासनाच्या अहवालात मात्र जिल्ह्यात पीक नुकसान निरंक होते. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पीक नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी केली. त्याची दखल घेत शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. आता या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ६३,९२६.५१ हेक्टर आर क्षेत्रातील विविध पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे त्यात निष्पन्न झाले असून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७६ कोटी ३७ लाख ९८ हजार ४९८ रुपयांच्या निधीची मागणीही केली आहे.

Vidharbha
Health Tips : थंडी आहे म्हणून मुलांना घरी बसवून ठेऊ नका,या आजारांचा विळखा वाढेल

या संदर्भातील अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना १८ डिसेंबर रोजी सादर केला आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निकषानुसार ७६ कोटी ३७ लाख ९८ हजार ४९८ रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे या अहवालात नमूद आहे.

Vidharbha
Car Tips for Winter : गाडीच्या काचेवर वारंवार येतोय फॉग? 'या' टिप्सचा होईल फायदा

मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात नुकसान निरंक

वाशीम, मालेगाव आणि रिसोड या तीन तालुक्यात ६३,९२६.५१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. तरीसुद्धा मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यात कुठेच ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या पंचनाम्यात सिद्ध झाले नाही.

Vidharbha
Hygiene Tips For Women : प्रत्येक महिलेला शारीरिक स्वच्छतेच्या या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!

कोणत्या पिकांसाठी किती निधी अपेक्षित

जिरायती - ३३,२१,९४,८४८

बागायती - ४३,१६,०३,६१०

कोणत्या तालुक्यात किती हेक्टरवर नुकसान

वाशीम - १२,३४७.५४

मालेगाव - १६,२९९.५९

रिसोड - ३५,२७९.३८

कोणत्या पिकाचे किती

नुकसान (हेक्टर)

तूर - ३६०६५.१०

कपाशी - २,५७८.२२

भाजीपाला- २५८.६१

ऊस - २५.९४

हरभरा - २४,९६१.३४

गहू - ३८.००

अवकाळीने २ लाख ६ हजार १६४ शेतकरी गारद

२६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जिल्ह्यातील ३६५ गावांतील २ लाख ६ हजार १६४ शेतकऱ्यांना फटका बसला. या शेतकऱ्यांच्या ६३,९२६.५१ हेक्टर आर क्षेत्रातील विविध पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com