चिमुकल्या विद्याला हवा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

टेकाडी - कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी हाताला मिळेल ते काम करणारे वडील, पतीच्या मदतीसाठी हाताला मिळेल ते काम करून परिस्थितीला ठिगळं लावण्यासाठी धडपडत असलेली आई तर महागाईच्या दुनियेत ‘आम्ही दोन, आमचे एक’ या संकल्पनेवर जगत असलेले पारशिवनी तालुक्‍यातील भागेमाहेरी येथे राहणारे किशोर काकडे. त्यांची तीनवर्षीय मुलगी विद्या हिला दुर्धर आजाराने ग्रासलेले आहे. एकीकडे मुलीचे आयुष्य तर दुसरीकडे हलाखीची परिस्थिती असल्याने किशोर यांना मदतीसाठी वणवण फिरण्याची वेळ आली.

हातावर आणून पानावर खाणे या परिस्थितीत कांबळे दाम्पत्याने संसाराचा गाडा हाकायला सुरवात केली. तीन वर्षांआधी विद्याच्या आगमणाने घर नाचू खिदळू लागले. परंतु हा आनंद नियतीला पहावला नाही. 

वर्षभरातच दुर्धर आजाराने विद्याला ग्रासले. हाती चार पैसे जुळत नसल्याने सध्या किशोर यांच्यासमोर विद्याच्या उपचाराचा प्रश्न उभा राहिला आहे. कांबळे यांनी विद्याला खासगी ते शासकीय रुग्णालयात दाखवले. आजारात तीळमात्रही सुधारणा होत नसल्याने त्यांनी विद्याच्या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. डॉक्‍टरांनी विटा थॅलेशियस रोगाची लागण झाल्याचे सांगितले. जीवघेण्या आजारापासून सुटकेसाठी ‘बोनमॅरो’ बदल व्हावा लागत असून त्याचा खर्च तीस लाखांच्या घरात खर्च असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली.

आर्थिक साहाय्याची विनंती 
आता प्रत्येक आठवड्‌याला विद्याला रक्त चढवावे लागते. त्याचाही खर्च सध्या त्यांच्या आवाक्‍यात नसल्याचे कांबळे सांगतात. डॉक्‍टरांनी बोनमॅरो पूर्णपणे बरा होत नसल्याचेही संकेत दिले आहेत. बोनमॅरो बदलल्यास विद्याच्या चेहऱ्यावरचे हसू आणि कांबळे कुटुंबीयांचे घर पुन्हा गुण्यागोविंदाने न्हाऊन निघू शकते. परंतु सध्या तिला गरज आहे मदत स्वरूपी दान दात्यांच्या मायेस्वरूपी फुंकेची. तेव्हा विद्याच्या उपचारासाठी सढळ हाताने मदत करण्याची विनंती पीडित वडिलाने केली आहे.

Web Title: vidya kakade help sickness

टॅग्स