उद्यापासून विद्याभारतीच्या क्रीडा स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर ः भारतीय शालेय क्रीडा महासंघाची मान्यता असलेल्या विद्याभारतीच्या उषाताई टेंभूर्णीकर करंडक विदर्भस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सोमवार, 12 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती विद्याभारतीचे विदर्भ विभाग शारीरिक प्रमुख सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा एकूण नऊ खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात बॉल बॅडमिंटन आणि कबड्डीची फक्त निवड चाचणी घेण्यात येणार आहे. 17 वर्षांखालील मुलामुलींची कबड्डी निवड चाचणी 12 ऑगस्ट रोजी खंडेलवाल ज्ञानमंदिर, अकोला येथे होत आहे.

नागपूर ः भारतीय शालेय क्रीडा महासंघाची मान्यता असलेल्या विद्याभारतीच्या उषाताई टेंभूर्णीकर करंडक विदर्भस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सोमवार, 12 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती विद्याभारतीचे विदर्भ विभाग शारीरिक प्रमुख सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा एकूण नऊ खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात बॉल बॅडमिंटन आणि कबड्डीची फक्त निवड चाचणी घेण्यात येणार आहे. 17 वर्षांखालील मुलामुलींची कबड्डी निवड चाचणी 12 ऑगस्ट रोजी खंडेलवाल ज्ञानमंदिर, अकोला येथे होत आहे. 17 वर्षांखालील मुलामुलींची आर्चरी स्पर्धा 17 तारखेला कलोडे महाविद्यालय, ओंकारनगर तर 14, 17, 19 वर्षांखालील मुलामुलींची खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धा 22 व 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर होईल. 14 व 17 वर्षांखालील मुलामुलींची बास्केटबॉल स्पर्धा 26 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या मैदानावर घेण्यात येईल. 17 वर्षे मुलामुलींची सॉफ्टबॉल स्पर्धा 5 सप्टेंबर रोजी आणि ऍथलेटिक्‍स व क्रॉस कंट्री स्पर्धा 29 व 30 सप्टेंबर रोजी विभागीय क्रीडासंकुल मानकापूर येथे घेण्यात येईल. विजेत्यांना पदक आणि सर्वसाधारण विजेत्यांना उषाताई टेंभूर्णीकर करंडक प्रदान करण्यात येईल. विदर्भस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर पश्‍चिम विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येईल. व्हॉलीबॉल आणि ऍथलेटिक्‍स स्पर्धेचे आयोजन नागपुरातच करण्यात आले आहे. कबड्डी, सॉफ्टबॉल आणि आर्चरीचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे देण्यात येणारी क्रीडागुण सवलत विद्याभारतीच्या खेळाडूंनी लागू असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. माहितीसाठी जितेंद्र घोरदडेकर यांच्याशी 9823016521 क्रमांकावर संपर्क साधावा. पत्रकार परिषदेला विद्याभारती विदर्भ प्रांताचे मंत्री सतीश खोत, पश्‍चिम विभागाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत देशपांडे, पद्माकर चारमोडे, जितेंद्र घोरदडेकर, सोनाली पाथ्रडकर, प्रिया भोरे, मंगेश पौनीकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidyabharati sports meet from tommarow